बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपामध्ये जुन्या फॉर्म्युल्यावर मंथन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे सरकार स्थापन झाल्यास नितीश कुमार मुख्यमंत्री असतील. भाजपाच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री असतील. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग होऊ शकतात. याच दरम्यान, RJD ने नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बिहारमधील राजकीय परिस्थितीवर RJD नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, मी सध्या काही बोलू शकत नाही. या प्रकरणावर फक्त लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादवच भाष्य करू शकतात. नितीश कुमार म्हणाले होते की, ते पुन्हा कधीही भाजपामध्ये (एनडीएसोबत) सामील होणार नाहीत, मग ते कसे जाऊ शकतात. आजही मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कोणतंच उत्तर मिळालं नाही.
शिवानंद तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचा एक कार्यक्रम नितीश कुमार यांनी रद्द केला. नितीश कुमार म्हणाले होते की, मी जाणार नाही, आरएसएस मुक्त देश बनवू पण आम्ही जाणार नाही. असं बोलल्यावर पण कशी यांची हिंमत झाली. आम्ही खूप प्रयत्न केले, पण वेळ मिळाला नाही.
बिहारमध्ये अनेक ठिकाणी असे बोर्ड लावण्यात आले आहेत, जे नितीश कुमार यांनी लावले आहेत, ज्यामध्ये गांधीजींचे तत्वज्ञान सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये सात पापांचा उल्लेख केला आहे. त्यातलं पहिलं पाप हे सिद्धांतहीन राजकारण होतं, मग त्या पापाचे पापी नितीश कुमार कसे काय बनू शकतात. आज त्यांनी जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या देण्याबाबत जे काही म्हटलं आहे ती नवीन गोष्ट नाही असंही शिवानंद तिवारी यांनी म्हटलं आहे.