शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

उद्धव ठाकरेंसारखा धक्का बसण्यापासून नितीश कुमार कसे वाचले?; वाचा बिहारमधील Inside Story 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 3:50 PM

भाजपाचे नेते आरसीपी सिंहमध्ये नवीन 'एकनाथ शिंदे' शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे.

पटना - बिहारच्या राजकारणात महाराष्ट्रासारखी पटकथा लिहिली जात होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. बिहारमध्येही आरसीपी सिंह यांच्या निमित्ताने शिंदे मॉडेलची राजकीय पुनरावृत्ती सुरू होती. परंतु याची वेळीच भनक ओळखून नितीश कुमारांनी अशी तयारी केली ज्यामुळे जेडीयूची अवस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी झाली नाही. 

नितीश कुमार यांनी एकीकडे भाजपाच्या नेतृत्वाचा भरवसा कायम ठेवला तर दुसरीकडे आरजेडीसोबत मिळून सरकार बनवण्याची रणनीती आखत राहिले. नितीश कुमारांनी आरसीपी सिंह यांची हालचाल पाहून त्यांचे अधिकार छाटण्याचे काम सुरू केले. त्यानंतर भाजपाला मात देण्यासाठी प्लॅनिंग रचली. त्यामुळे चिराग पासवान आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी अवस्था नितीश कुमारांची होण्यापासून वाचली. 

लालू प्रसाद यादव यांच्या कथित जंगलराजच्या दहशतीत विकासाचं राजकारण करणारं नेतृत्व म्हणून नितीश कुमार संघर्षातून राजकारणात आले आहेत. भाजपासोबत नितीश कुमार सरकार चालवत होते. परंतु भाजपाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष होते. कारण २०२० पासून बिहार भाजपा नेत्यांच्या मनात सर्वाधिक जागा मिळूनही नितीश कुमारांच्या हाताखाली काम करणं खुपसतं होते. दबावामुळे नितीश कुमारांच्या नेतृत्वात सरकार चालवावी लागत होती. 

आता राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री असावा अशी स्थानिक नेत्यांची इच्छा होती. परंतु केंद्रीय नेत्यांच्या दबावापुढे सगळे शांत होते. मात्र भाजपात नाराजी पसरत चालली होती. जेडीयू-भाजपा नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगत होते. याचवेळी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे बंड पुढे आले. तेव्हा शिवसेनेप्रमाणे जेडीयूत फोडाफोडी करण्यात यश आले तर बिहारमध्ये बाजी पलटू शकते असं भाजपा नेत्यांना वाटत होते. 

भाजपाचे नेते आरसीपी सिंहमध्ये नवीन 'एकनाथ शिंदे' शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे. बिहारमध्ये आरसीपी सिंह यांच्या बहाण्याने जेडीयूमध्ये फोडाफोडी करण्याच्या तयारीत होते, पण नितीश कुमार अतिशय काटेकोरपणे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आरसीपी सिंह यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक नितीश यांना ठाऊक होती. जेडीयू अध्यक्ष ललन सिंह यांनी आरसीपीवर निशाणा साधताना 'नितीश कुमारांनी आंधळा विश्वास ठेवला, पण तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला' असे म्हटले आहे. भाजपचे एजंट बनून जेडीयूमध्ये काम केले असा आरोप केला. 

आरसीपी सिंह यांना कमकुवत केलेबिहारमधील जेडीयूचे राजकीय भवितव्य महाराष्ट्रातील शिवसेनेसारखे होऊ नये यासाठी नितीशकुमार यांनी आधीच सर्व तयारी केली होती. जेडीयूने आरसीपी सिंह यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले नाही त्यामुळे त्यांना केंद्राच्या मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावं लागले. यानंतर, आरसीपीला कमकुवत करत, त्यांच्याकडून सर्व महत्त्वाची पदे हिसकावून घेतली आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांना संपवण्यात आले. यातूनच नितीश कुमारांनी पार्टी वाचवली आणि उद्धव ठाकरेंची अवस्था त्यांची झाली नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाShiv Senaशिवसेना