तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकारी निवासस्थान सोडून लालू प्रसाद यादव यांच्या शेजारच्या बंगल्यात राहावयास गेले तेव्हापासून दोघांत दृढ सलोखा झाला. त्याची निष्पत्ती मंगळवारी नवीन राजकीय समीकरणांतून दिसून आली. अनेक कारणे आहेत, ज्यामुळे लालुंसोबत पुन्हा मैत्री करण्याची गरज नितीश कुमार यांना पडली. एकीकडे महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत आलं असलं तरी बिहारमध्ये मात्र नितीश कुमारांनी राजदचा हात धरत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
बुधवारी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे राजभवनावर पोहोचले. या ठिकाणी राज्यपाल फगू चौहान यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिवी. तर तेजस्वी यादव यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमत्रिपदी विराजमान झाले आहेत. शपथविधी सोहळ्याला राबडी देवी, तेजप्रताप यादव, जीनत रामन मांझी हेदेखील उपस्थित होते.