शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Bihar: बिहारमध्ये बदलताहेत राजकीय समिकरणे, RJD-JDU मध्ये फूट? तेजस्वी यादव म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:21 AM

RJD Vs JDU: गेल्या काही वर्षांपासून बिहारच्या राजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत.

 पाटणा - गेल्या काही वर्षांपासून बिहारच्याराजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत. आता राज्यातील महाआघाडीमध्ये फूट पडल्याच्या चर्चांना वेग आला आहे. आरजेडी आणि जेडीयूमधील नेत्यामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध दोन्ही पक्षांमधील परस्पर सहमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या घडामोडींबाबत आरजेडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विचारले असता ते संतप्त झाले.महाआघाडीमधील या बेबनावाबाबत विचारले असता तेजस्वी यादव यांनी प्रसारमाध्यमांनाच चार शब्द सुनावले. ते म्हणाले की, तुमच्या संस्थांमध्ये काय करायचं हे संपादक ठरवतात, की वार्ताहर संपादकांना सांगतात की, काय करायचं आहे ते, असे तेजस्वी यादव म्हणाले. 

बिहारच्याराजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेल्या आरजेडी आणि जेडीयूने २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा आघाडी करत सरकार स्थापन केले होते.  मात्र गेल्या काही दिवसांत नेत्यांमध्ये होत असलेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद तीव्र होत असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये होत असलेल्या मतभेदांचे कारण आरजेडी नेते आणि शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस बाबत केलेले वादग्रस्त विधान असल्याचे सांगण्यात येत आहे.

या विधानावरून भाजपा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका जेडीयू नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी जेडीयूकडून केली जात आहे. मात्र आरजेडी या मागणीवर अंमलबजावणी न करता परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल