शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप?, नितीश कुमारांनी बोलावली खासदार, आमदारांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 5:48 PM

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे.

नवी दिल्ली- 

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. याचाच एक भाग म्हणजे आज जदयूचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्ष मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार 'राजद'च्या आमदारांनाही तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांना राजधानी पाटणामध्येच राहण्यास सांगितलं आहे. भाजपासोबतच्या वादामुळे नितीश कुमार आता पुन्हा एकदा भाजपाची साथ सोडून 'राजद'सोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे. 

भाजपापासून नितीश कुमार दूरचभाजपाच्या दोन महत्वाच्या नेत्यांनी बिहारमध्ये रोड शो केला, बैठकाही घेतल्या पण याकडे नितीश कुमार यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. भाजपा नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठका, माजी राष्ट्रपतींनी आयोजित केलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम, राष्ट्रपतींचा शपथविधी, निती आयोगाची बैठक अशा सर्व महत्वाच्या कार्यक्रमांना नितीश कुमार यांची अनुपस्थिती होती. 

मोदी कॅबिनेटपासूनही नितीश कुमार दूरचएका बाजूला भाजपा-जदयूमध्ये सारंकाही आलबेल नाही अशी चर्चा होत आहे. तर दुसरीकडे जदयूचे राष्ट्रीय ललन सिंह यांनी भाजपासोबत सुसंवाद असल्याचा दावा केला आहे. "भाजपासोबत ऑल इज वेल आहे. आम्ही केंद्रात कॅबिनेटमध्ये सहभागी होणार नाही. २०१९ मध्येच ठरलं होतं की जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. जदयू विरोधात षडयंत्र रचली जात आहेत. पण त्याचा पक्षावर काहीच परिणाम होणार नाही. याआधी चिराग पासवान मॉडल आणला गेला. आता आणखी एक मॉडल आणण्याची तयारी केली जात आहे. पण जदयू विरोधात कोणतंच मॉडल यशस्वी होणार नाही", असं ललन सिंह म्हणाले. 

निती आयोगाच्या बैठकीलाही नितीश कुमार अनुपस्थितराजधानी दिल्लीत आज निती आयोगाची बैठक बोलवण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित होते. नितीश कुमारांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पण नितीश कुमार नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. अजूनही त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित होते असं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदी