शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

Bihar Politics: त्या नेत्याला साईडलाईन करणं भाजपाला नडलं, बिहारच्या सत्तेतून पायउतार व्हावं लागलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:28 PM

Sushil Kumar Modi: जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी अगदी सावध आणि शांतपणे पावले उचलत बिहारच्या सत्तेतून भाजपाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, भाजपावर बिहारमध्ये ओढवलेल्या नामुष्कीसाठी एका ज्येष्ठ नेत्याला साईडलाईन करणं कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.

पाटणा - जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी अगदी सावध आणि शांतपणे पावले उचलत बिहारच्या सत्तेतून भाजपाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, भाजपावरबिहारमध्ये ओढवलेल्या नामुष्कीसाठी एका ज्येष्ठ नेत्याला साईडलाईन करणं कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. या नेत्याचं नाव आहे सुशील कुमार मोदी. बिहारमधील गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सुशील कुमार मोदी हे भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मात्र २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षश्रेष्ठींनी सुशील कुमार मोदींना बिहारच्या राजकारणातून दूर करत त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देत दिल्लीत आणले. मात्र भाजपाची हीच खेळी आता पक्षाला महागात पडल्याचे दिसत आहे.

बिहारच्या राजकारणात सुशील कुमार मोदी यांना सत्तेचं सूत्रधार म्हणून ओळखले जाते. एप्रिल २०१७ मध्ये मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर आरोपांच्या तुफान फैरी झाडण्यास सुरुवात केली होती. त्याचा परिणाम म्हणून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षांमधील महाआघाडी फुटून जुलै २०१७ मध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपासोबत आले होते. मात्र सुशील कुमार मोदी बिहारच्या राजकारणातून दूर होताच भाजपाच्या नशिबी पुन्हा एकदा राजकीय वनवास आला आहे.

नितीश कुमार पुन्हा भाजपासोबत आल्यानंतर भाजपा आणि जेडीयू हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढले होते. त्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएला ४० पैकी ३९ जागा मिळाल्या होत्या. तर २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही एनडीएने चांगली कामगिरी करत विजय मिळवला होता. मात्र याचदरम्यान, सुशील कुमार मोदी यांचे पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाले. त्यातच त्यांची रवानगी राज्यसभेत करण्यात आली. सुशील कुमार मोदी यांच्याकडे पक्षाचा मोर्चा सांभाळण्याची हातोटी होती. नितीश कुमारही सुशील कुमार मोदी यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन असत. त्यांनी नाराजी व्यक्त केल्यास नितीश कुमार जेडीयूच्या नेत्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देत. मात्र भाजपाने सुशील कुमार मोदी यांना बिहारमधून बाजूला केले आणि भाजपासाठी सगळी समिकरणेच बिघडली.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपा