बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेनंतर सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला. नितीश म्हणाले, केवळ दिल्लीतील केंद्र सरकारचीच चर्चा होते. सोशल मिडियापासून ते टीव्हीपर्यंत त्यांचाच प्रचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी दिल्लीवाल्यांचाच कब्जा आहे. एवढेच नाही, तर, आम्हाला कुणी दुसऱ्याने नव्हे, तर जनतेने मुख्यमंत्री बनवले आहे, असेही नितीश यावेळी म्हणाले.
आणखी काय म्हणाले नितीश? - नीतीश म्हणाले, विश्वासदर्शक ठरावावर बरीच चर्चा झाली. सर्वांनीच आपापले म्हणणे मांडले. आम्हाला कुणावरही हरकत नाही. आधी चार पक्षांचे सरकार होते. एक पक्षाला तर स्वतःत विलीन करून घेतले. आम्ही तर काम करत होतो, तर मग काय होत होते. आपल्या संदर्भात आमची कुठलीही तक्रार नाही. आम्ही आपल्याला काहीही म्हणत नाही.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भाषणादरम्यान पाटणा युनिव्हर्सिटीला सेंट्रल व्हिव्हि बनविण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाव न घेता, अरसीपी सिंह यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, आम्ही ज्याला वर नेले, त्याला आपल्यात सामील करून काय केले. आमच्या पक्षातील लोक म्हणत होते, की सर्व गडबड झाली. विधानसभा निवडणुकीत काय केले, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक जुन्या नेत्यांना हटविले. आजकल प्रचार फक्त दिल्लीतील लोकांचाच होतो, असेही नितीश यावेळी म्हणाले.