पाटणा : बिहार, सिक्किम आणि उत्तर बंगालमधील दार्जिंलिंगच्या पर्वतीय भागात गुरुवारी रात्री सौम्य भूकंपाचे हादरे बसले. बिहारमध्ये रात्री ९ वाजता पाटण्यासह काही भागात ५.२ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली.भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये असल्याचे हवामान विभागाचे संचालक ए.के. सेन यांनी सांगितले. पाटणा, दरभंगा, समस्तीपूर, किशनगंज, अररिया, मधुबनी या भागात किमान १० सेकंद हादरे जाणवले. त्यानंतर लोकांनी सुरक्षितस्थळी जाण्यासाठी एकच धावपळ केली. सुदैवाने कुठेही प्राणहानी किंवा संपत्तीचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
बिहार, उ. बंगालला सौम्य भूकंपाचे हादरे
By admin | Published: December 19, 2014 4:32 AM