Bihar News :बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन लाख रुपये देऊन IPS अधिकारी बनलेल्या तरुणाला सिकंदरा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकारी बनवतो म्हणून तरणांना फसवणाऱ्या टोळीची माहिती पोलिसांना लागली आहे. आता या टोळीचा पर्दाफाश जमुई पोलीस करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, मिथलेश कुमार नावाचा व्यक्ती लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस स्टेशन क्षेत्रातील गोवर्धन बिघा गावचा रहिवासी आहे. IPS चा गणवेश परिधान करून आणि कमरेला पिस्तूल बांधून तो आपल्या दोन लाखांच्या दुचाकीवरुन गावा फिरू लागला. यावेळी तो काही कामानिमित्त सिकंदरा चौकात थांबला असता त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
मिथलेशचा अवतार पाहून लोकांना काहीतरी विचित्र वाटले. कुणीतरी सिकंदरा पोलीस ठाण्याचे प्रभारी मिंटू कुमार सिंग यांना माहिती दिली. यानंतर सिकंदरा पोलिसांनी मिथलेश कुमारला चौकातून अटक केली. पोलिसांच्या चौकशीत ज्या गोष्टी समोर आल्या, त्या अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहेत. जमुई पोलीस आता सखोल चौकशी करत आहेत.
मामाकडून दोन लाख रुपये कर्ज घेतलेबनावट आयपीएस म्हणून अटक करण्यात आलेल्या मिथिलेश कुमारने सांगितले की, खैरा भागातील मनोज सिंग नावाच्या व्यक्तीने त्याला पोलिसात नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून दोन लाख रुपय तीस हजार रुपयांची मागणी केली. मिथलेशने त्याच्या मामाकडून दोन लाख रुपये कर्ज घेऊन मनोजसिंगला दिले.
आईचा आशीर्वादही घेतलामनोज सिंगने मिथिलेशच्या शरीराचे माप घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्याला पोलीस गणवेश, आयपीएस बॅच आणि पिस्तूल दिले. मिथलेश आनंदाने गणवेश घालून त्याच्या घरी गेला, आईचे आशीर्वाद घेतले आणि उर्वरित 30 रुपये देण्यासाठी घरातून निघाला. यादरम्यान त्याला सिकंदरा चौकात पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी एसडीपीओ सतीश सुमन म्हणाले की, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. मिथलेश कुमारने खरंच दोन लाख रुपये देऊन बनावट आयपीएस गणवेश खरेदी केला असेल, तर जमुई पोलिसांसमोर त्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान असेल.