बिकानेर: पाळीव प्राणी हिंसक होऊन स्वतःच्या मालकावर हल्ला केल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण, पाळीव उंटाने स्वतःच्या मालकाचा जीव घेतल्याचे तुम्ही कधीच ऐकले नसेल. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका उंटाने मालकाला दातांनी पकडून खाली पाडले आणि नंतर पायाने चिरडून ठार केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी उंटाला काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा आहे.
नेमकं काय झालं?मिळालेल्या माहितीनुसार, घटना बिकानेर जिल्ह्यातील पाचूची आहे. पाचू पोलीस ठाण्याचे अधिकारी मनोज यादव यांनी सांगितले की, या दुर्घटनेत मोहनराम नायक याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोहनराम शेतात गेले होते. त्यांचा उंटही तिथेट होता. त्यावेळी दुसरा उंट तिथे आला. त्याला पाहताच मोहनरामच्या उंटाने दोर तोडून दुसऱ्या उंटाच्या पाठलाग सुरू केला.
सोहनराम त्याचा उंट पकडण्यासाठी त्याच्या मागे धावला. सोहनरामने पकडताच उंटाला राग आला. त्याने सोहनरामला दाताने चावा घेतला आणि खाली पाडले. यानंतर त्याला पायाखाली चिरडले आणि नंतर सोहनरामच्या अंगावर बसला. शेतात त्याला वाचवणारे कोणी नव्हते. काही वेळातच सोहनरामचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी उंटाला बेदम मारहाण केलीया घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. सोहनलालच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी उंटाला काठ्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात अनेकदा उंटाच्या तोंडातून फेस येतो. याला स्थानिक भाषेत झूट म्हणतात. अशा स्थितीत उंट अतिशय संतप्त आणि धोकादायक बनतो. त्याला काळजीपूर्वक नियंत्रित केले पाहिजे.