नवी दिल्ली : कतारची राजधानी दोहा येथे मार्च महिन्यात होणाऱ्या विश्व बीच व्हॉलिबॉल स्पर्धेवर जर्मनीच्या महिला संघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामी राष्ट्र असलेल्या कतारमध्ये महिलांना शरीरबंद कपडे घालण्याचा नियम आहे.
बीच व्हॉलिबॉलमध्ये महिला खेळाडू बिकिनी घालतात. बिकिनी घालण्यास मनाई केली म्हणून जर्मनीच्या खेळाडूंनी स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. जर्मनीच्या बीच व्हॉलिबॉल स्टार कार्ला बॉर्गर आणि ज्युलिया स्यूड यांनी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कतार हा एकमेव असा देश आहे, जेथे खेळाडूंना कोर्टवर बिकिनी घालण्यास तो मनाई करतो,’ असे या दोघींचे मत आहे. मार्चमध्ये कतारमध्ये ३० अंश सेल्सियस तापमानाचा आम्हाला त्रास होऊ शकतो,’ असेही त्या म्हणाल्या.
बॉर्गरने रविवारी रेडिओ कार्यक्रमात सांगितले, ‘आम्ही दोहा येथे आमचे काम करणार आहोत. पण त्या कामासाठी आवश्यक कपडे घालण्यास मनाई केली जात आहे. कतार जगातील एकमेव असा देश आहे ,जे थे सरकार सांगते ,‘ आम्ही कसे खेळायचे’,मी याचा निषेध करते. कतारमध्ये खेळाच्या कोर्टवर कपड्यांच्या संदर्भात फार कठोर नियम आहेत. त्यामुळेच विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती सिल्व्हर बॉर्गर आणि तिची जोडीदार स्यूड यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.