नवी दिल्लीः जगभरात कोरोनाचा फैलाव झाला असून, अनेक देश त्याला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. भारतातही मोदी सरकारच्या प्रसंगावधानामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला नाही. विशेष म्हणजे कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्यानं त्यांचं कौतुक होत आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी मोदींना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून त्यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. भारताने योग्य वेळी निर्णय घेतलापंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात गेट्स म्हणाले, कोरोनाविरुद्धच्या युद्धात तुम्ही आणि तुमच्या सरकारने वेळेत ज्या प्रकारे महत्त्वाची पावलं उचलली आहेत ती कौतुकास्पद आहेत. कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर भारतानं लागलीच लॉकडाऊन जाहीर केले. याव्यतिरिक्त हॉटस्पॉट साइट्सही ओळखल्या गेल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कोट्यवधी लोकांना प्रशासनाच्या मदतीने होम क्वारंटाइन करण्यात आलं.भारताची आरोग्य व्यवस्था होतेय मजबूतया सर्वांव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे अधिकाधिक चाचण्या घेण्यावर लक्ष केंद्रित केले. आवश्यकतेनुसार संपूर्ण परिसर सील करण्यात आला. तसेच आरोग्य व्यवस्था भारत सातत्यानं मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडून सर्व आवश्यक उपाययोजना वेळेवर केल्या जात आहेत.
coronavirus : ...अन् बिल गेट्स यांनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणाले, असं काही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 9:09 PM