ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - लोकपाल आणि लोकायुक्त विधेयके दुरुस्तीनंतर लोकसभेत मंजूर करण्यात आली असताना त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी बेनामी संपत्तीसंदर्भातील संसदेत मांडलेलं विधेयकही मंजूर झालं आहे. आता ते विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.
नीट परीक्षेसंदर्भातील लोकसभेत मंजूर झालेली दोन विधेयके राज्यसभेत मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बेनामी संपत्ती विधेयक मंजूर करून कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न होताना दिसतो आहे. त्याचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर व्यावहारिक अडचणींवर मात होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी दिली आहे.
मात्र लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयके राज्यसभेत मंजूर होणं तितकंच महत्त्वाचं आहे. संसदेत 14 वर्षांखालील मुलांकडून घरकाम अथवा दुसरं कुठलंही काम करून न घेण्यासंबंधित मांडलेलं विधेयकही मंजूर झालं आहे. त्यामुळे आता 14 वर्षांखालील मुलांना घरकाम किंवा हॉटेलमध्ये कामावर ठेवता येणार नाही.