शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कोरोना महासाथीदरम्यान १० अब्जाधीशांनी कमावली इतकी संपत्ती, जगभरातील गरीबीही झाली असती कमी : ऑक्सफाम

By जयदीप दाभोळकर | Published: January 25, 2021 10:42 AM

या कालावधीत अब्जाधीशांनी कमावलेली संपत्ती इतकी होती की जगात प्रत्येकाला कोरोना लसही मोफत देता आली असती, ऑक्सफामचा दावा

ठळक मुद्देप्रवासबंदी असतानाही अब्जाधीशांकडून खासगी जेटची खरेदीकोरोनाच्या कालावधीत गरीब श्रीमंतांमधील दरी अधिक वाढली

कोरोना महासाथीदरम्यमान जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे अनेक लोकांनी आपलं काम गमावल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचीही वेळ आली होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरता असलेली असमानता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. याचाच परिणाम शिक्षण, आरोग्य आणि उत्तम जीवन जगण्याच्या अधिकारांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या दरम्यान श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्तींमधील अंतरही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नॉन प्रॉफिट समूह ऑक्सफाम (Oxfam) चा एक अहवाल सोमवारी प्रकाशित करण्यात आला. स्वित्झर्लंड मध्ये होणाऱ्या दावोस समिटमध्ये हा अहवाल सादर केला जाणार असल्याचं ऑक्सफामनं सांगितलं. 'The Inequality Virus' या शीर्षकाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचं शोषण करणारी व्यवस्था ज्यामध्ये असमानता आणि हुकुमशाही, रंगभेद आणि काही विशिष्ट लोकांच्या वर्चस्वाला मिळत असलेल्या उत्तेजनावर यावर या अहवालाद्वारे टीका करण्यात आली आहे. जगभरात १८ मार्च ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अब्जाधीशांच्या संपत्तीत ३.९ ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. तसंच या कालावधीत जगभरातील पहिल्या १० अब्जाधीशांच्या संपत्तीत ५४० दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या महासाथीदरम्यान कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला. तर अनेक जण उपासमारीच्या उंबरठ्यावर आले. या महासाथीच्या दरम्यान कमीतकमी २०० ते ५०० दशलक्ष लोकं गरीबीच्या उंबरठ्यावर आल्याचं या अहवालाद्वारे सांगण्यात आलं आहे.

जगात जे लोकं २ डॉलर्स ते १० डॉलर्स प्रतिदिवस या उत्पन्नावर अवलंबून असतात ते दारिद्र्याच्या रेषेपासून अवघ्या एका चेकच्या दुरीवर आहेत. त्यांना एक पगार न मिळाल्यास ते दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात, असं ऑक्सफामनं अहवालात नमूद केलं आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवासबंदी करण्यात आली होती. परंतु त्या कालावधीत काही अब्जाधीशांनी खासगी जेटही खरेदी केल्याचा दावा ऑक्सफामनं आपल्या अहवालातून केला आहे. 

कोरोना लस जगाला मोफत देण्याइतकी संपत्तीअहवालानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जगातील १० मोठ्या अब्जाधीशांनी इतकी संपत्ती बनवली की जगातील प्रत्येकाला गरीबीपासून लाचवण्यासाठी आणि सर्वाना कोरोनाची लस मोफत देता आली असती. जगभरात मानवाकडे गरीबीतून बाहेर पडण्यासाठी कोणताही ठोस तोडगा नाही. अब्जाधीशांच्या संपत्तीचा वापर लाखो लोकांचं जीवन आणि अब्जावधी लोकांचे रोजगार वाचवण्यासाठी वापरता आला पाहिजे, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMONEYपैसा