नवी दिल्ली : स्वच्छ भारत मोहिमेत रेल्वेने मोठा हातभार लावण्यासाठी भक्कम पावले उचलली आहेत. २०२१ पर्यंत रेल्वेचे सर्व डबे जैव-शौचालयांनी (बायो- टॉयलेट) जोडली जातील. सध्याची १७,३३८ शौचालये टप्प्याटप्प्यात हटविण्यासाठी एक कृती योजना आखण्यात असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नमूद केले. १०,५०० नव्या डब्यांना बायोटॉयलेट जोडण्याचे काम २०१६-१७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. २०१५-१६ या चालू वर्षात १७ हजार नवी बायोटॉयलेटस् बसविली जातील.स्वच्छ भारतमध्ये रेल्वेचे योगदान
> रेल्वेगाड्यांमधील बायोटॉयलेट योजनेस गती.
> वर्षअखेरीस ३६७ कि.मी. लांबीचे लोहमार्ग मानवी विष्ठामुक्त करण्याचे उद्दिष्ट.
> गांधी जयंतीपर्यंत १७४ कि.मी. लांबीच्या मार्गावर बायोटॉयलेट असलेल्या रेल्वे धावणार. प्रत्येकी तीन लाख रुपये खर्च करून ६००० प्रवासी रेल्वेडबे बायोटॉयलेटने सज्ज.घाण करणाऱ्यांना महापालिका आकारणार दंड> स्वच्छ भारत मोहिमेला कायदेशीर पाठबळ देण्याचा विचार सरकार करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे अथवा कचरा फेकणे हा गुन्हा ठरवून दंड ठोठावण्याचा अधिकार महापालिकांना देण्यासंबंधी कायद्याचा मसुदा तयार केला जाणार आहे.> स्वयंनियमन अपुरे ठरत असल्यामुळे स्वच्छतेसाठी कायदा आणणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी ज्या पद्धतीने चालान केले जाते त्याच धर्तीवर घाण पसरविणाऱ्यांवर जागीच गुन्हा नोंदला जाईल. नियमांचे अतिक्रमण टाळण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांना नव्या कायद्यात गुंफण्यात येईल. > घाण पसरविणाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी न्यायालयीन मार्ग अवलंबला जाऊ शकतो. एखाद्या भागात स्वाईन फ्लूचा उद्रेक झाल्यास संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होत असल्यामुळे त्याला स्थानिक मुद्दा ठरवता येत नाही, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.