नवी दिल्ली – बायोलॉजिकल ई कोविड १९ लस कॉर्बेव्हॅक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. बायोटेक्नॉलॉजी विभागाने (डीबीटी) शुक्रवारी सांगितले की, पाच वर्षांवरील मुले आणि प्रौढांच्या चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. कॉर्बेव्हॅक्स बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि त्याच्या पीएसयू बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कौन्सिल (बीआयआरएसी) च्या सहकार्याने विकसित केले जात आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी आकडेवारीनंतर विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) याचा आढावा घेतला. त्यानंतर भारतीय औषध महानिरीक्षकाने तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांना मंजुरी दिली आहे. DBT ने सांगितले, '१ सप्टेंबर २०२१ रोजी बायोलॉजिकल ई ला कॉर्बेव्हॅक्स लसीच्या टप्पा २ आणि ३ च्या चाचण्यांसाठी मान्यता मिळाली. लहान मुलं आणि प्रौढांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेच्या समोर ही चाचणी सादर करण्यास मदत मिळेल.
केरळमध्ये रुग्णसंख्या वाढली, 11 वीची परीक्षा घेण्यास 'सर्वोच्च' स्थगिती
आतापर्यंत जायडस कॅडिलाच्या कोविड १९ लसीला जायकोव-डी देशात १२ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यास आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. डीसीजीआयनं जुलैमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या २ ते १७ वयोगटातील मुलांना काही परिस्थितीत कोवोव्हॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचणीला परवानगी दिली होती.
लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याचा अजब आदेश; तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी
देशात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिने लागतील
भारतात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिन्यांचा कालावधी लागेल आणि अशा परिस्थितीत दीर्घकाळ मुलांच्या भविष्याचे नुकसान करता येणार नाही. मुलांच्या विकासासाठी शाळा उघडणे आवश्यक आहे. कारण मुलांसाठी शारीरिक संपर्क महत्त्वाचा असतो असं मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाची प्रकरणे कमी असलेल्या ठिकाणी शाळा उघडता येतात, असे शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. याचबरोबर, ते म्हणाले की, सर्व मुलांना ऑनलाइन अभ्यास करण्याची सुविधा नाही किंवा तशा परिस्थितीचे वातावरण नसते, त्यामुळे शाळा उघडणे आवश्यक आहे. जवळपास सर्व शाळांमधील शिक्षकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, त्यामुळे ही स्थिती सर्वात अनुकूल आहे असं त्यांनी सांगितले.