बायोस्कोप
By admin | Published: November 22, 2014 11:30 PM
मी स्टोरी टेलर, अर्थ तुम्ही काढा
अहमदनगर : कुटंुब व्यवस्था टिकावी यासाठी चांगला सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज आहे़ पती-पत्नी यांच्यातील वादानंतर अनेक कायद्यांचा आधार घेऊन खटले दाखल केले जातात़ काही प्रकरणात सत्यता तर काही खोटे प्रकरणेही समोर येतात हे टळण्यासाठी काही कायद्यांबाबत पुनर्विचार होणे गरजेचे आहे़ असे मत ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड़ उदय वारुंजीकर यांनी व्यक्त केले़ पुरुष हक्क संरक्षण समितीच्यावतीने आयोजित १७ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे ॲड़ वारुंजीकर यांच्याहस्ते उद्घाटन झाले़ यावेळी ते बोलत होते़ उद्योजक बाळासाहेब पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते़ यावेळी समितीचे राष्ट्रीय सचिव धर्मेंद्र चव्हाण, तेजस्वीनी मरोड, ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर, समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष मधुकर भिसे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते़ ॲड़ वारुंजीकर म्हणाले की, कायद्यामध्ये सतत दुरूस्ती होत असते़ मात्र, कायद्याची निर्मिती होत असताना त्यामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे़ विधीमंडळात पुरुषांबाबत निर्माण होणार्या कायद्याबाबत पुरुष हक्क संरक्षण समितीने लक्ष ठेवून त्यामध्ये वेळीच दुरुस्त्या सुचविणे गरजेचे आहे़ जसे महिलांवर अन्याय अत्याचार होतात़ त्याचप्रमाणे अनेक पुरुषही अत्याचाराचे बळी ठरत असतात़ त्याचे खटले जलदगतीने निकाली निघावेत यासाठी पाठपुरवा झाला तर अनेकांना न्याय मिळेल़ ज्या व्यक्तीची कलम ४९८ मधून निर्दोष मुक्तता झाली आहे़ त्यांना पुढील न्यायालयीन लढाईसाठी समितीने मदत करावी,असे सांगत वारुंजीकर म्हणाले की, अत्याचाराचे बळी ठरणारे गरजू पुरुषांसाठी समितीने मार्गदर्शन करावे तसेच महिला आणि पुरुषांनीही हक्काबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवावी, असे ते म्हणाले़ समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड़ शिवाजी कराळे यांनी प्रस्ताविकातून पुरुष हक्क संरक्षण समितीची भूमिका आणि कार्य स्पष्ट केले़ यावेळी बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, धर्मेंद्र चव्हाण गोपाळ मिरीकर यांनीही मनोगत व्यक्त केले़ शशिकांत नजन यांनी सूत्रसंचालन केले़चौकट- अधिवेशनात रविवारी कुटुंब व्यवस्था दुभंगण्यास जबाबदार कोण?, पुरुषांचे हक्क आणि कायदेशीर कर्तव्य, स्त्रियांनी कशी लावली संसाराची वाट या विषयांवर चर्चासत्र होणार आहे़ तसेच उपस्थितांच्या प्रश्नांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे़ फोटो आहे़