शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘बिपोरजॉय’चा तडाखा सुरूच, राजस्थानमध्ये रुग्णालयांत घुसले पाणी; चार जिल्ह्यांना पुराचा वेढा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 6:44 AM

अडकलेल्या ३० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.

जयपूर : बिपोरजॉय वादळामुळे राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जयपूर हवामान केंद्राने सोमवारी सवाई माधोपूर, बुंदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचवेळी कोटा, करौली, बारन, भिलवाडा आणि टोंकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकूण ४ जिल्ह्यांना पुराने वेढा घातला आहे. अडकलेल्या ३० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.

पावसामुळे अजमेरमधील सरकारी रुग्णालय जलमय झाले. १८ रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात हलवावे लागले. गेल्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी ३०० मिमी म्हणजेच १२ इंच पावसाची नोंद झाली. पाली, जालोर, बारमेर आणि सिरोहीमध्ये पूरस्थिती आहे. राज्यात पूर आणि पावसामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

हवामान विभागानुसार, १९ आणि २० जून रोजी ‘बिपोरजॉय’चा प्रभाव भरतपूर, कोटा विभागात असेल. चक्रीवादळ कमकुवत होत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल. त्यामुळे बुधवारपर्यंत त्याचा प्रभाव कमी होईल, असे मानले जात आहे.  चक्रीवादळ सध्या ताशी १० किमी वेगाने उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे.

आसाममधील पूरस्थिती; ३३४०० लोकांना फटकापूरस्थितीला सामोरे जात असलेल्या आसामच्या अनेक भागांत रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. शेतजमिनीसह खेडी व शहरे जलमय झाली आहेत. आसाममधील पूरस्थितीचा ३३४०० लोकांना फटका बसला आहे. चिंतेत भर घालणारी बाब म्हणजे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आसामसाठी अतिसतर्कतेचा इशारा जारी केला असून, गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

हजारो लाेकांना हलवलेचक्रीवादळामुळे जालोरमध्ये सर्वाधिक १८ इंच पाऊस झाला. तसेच अहोर येथे ४७१ मिमी, भीनमाळ २१७, राणीवाडा ३२२, चितळवण ३३८, सांचोरे २९६, जसवंतपुरा ३३२, बगोडा ३१० आणि सायला येथे ४११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जालोर येथील परिस्थिती अनियंत्रित झाली. एनडीआरएफ-एसडीआरएफच्या मदतीने हजारो लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.

हरयाणात चक्रीवादळाचा प्रवेशचंडीगड : राजस्थान, गुजरातनंतर बिपोरजॉय हरयाणात दाखल झाले आहे. चक्रीवादळामुळे रविवारी रात्री उशिरा वातावरणात बदल झाला. त्यानंतर ताशी ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू लागले, परंतु कोणतेही नुकसान झाले नाही. 

हिमाचलवर वादळाचा प्रभाव शिमला : बिपोरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव हिमाचल प्रदेशात दिसू लागला आहे. सिमला हवामान केंद्राने सोलन, शिमला, सिरमौर, मंडी आणि बिलासपूर या पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांत पालमपूरमध्ये सर्वाधिक ५७ मिमी आणि धरमशाला ४४ मिमी पाऊस झाला.

    गुजरातमध्ये... २४ तासांपासून उत्तर मुसळधार पाउस सुरू २० गाई पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडल्या २४ तासांत १२६ मिमी पाउस  बनासकांठामध्ये झाला.

    राजस्थानमध्ये...रुग्णालयांमध्ये पाणी शिरलेपावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला३० लोकांना सुरक्षित बाहेर काढले

टॅग्स :cycloneचक्रीवादळ