शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

वादळाचा तडाखा; गुजरात अस्ताव्यस्त! कच्छ, सौराष्ट्र भागांत मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 5:57 AM

चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राजस्थानातही मुसळधार पाऊस

अहमदाबाद: चक्रीवादळ बिपोरजॉयमुळे गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे एक हजार गावांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, पाच हजारांवर विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाशी संबंधित घटनांमुळे किमान २३ लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने या वादळात जीवितहानी झाली नाही.

मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या पाण्यामुळे किनारपट्टीवरील अनेक गावांत पूर आल्याने तारांबळ उडाली. तथापि, या वादळाचा जोर आता कमी झाला आहे. चक्रीवादळ बिपोरजॉय (बिपोरजॉय म्हणजे बंगालीमध्ये आपत्ती) हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जखाऊजवळ सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर धडकले. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १४० किमी होता.

राज्याचे मदत विभागाचे आयुक्त आलोककुमार पांडे यांनी पत्रकारांना सांगितले की, वादळाने एकूण ५८१ झाडे उन्मळून पडली. नऊ पक्की आणि २० कच्ची घरे कोसळली. दोन पक्की आणि ४७४ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. कच्छ जिल्ह्यातील स्वामिनारायण मंदिराच्या छताचे छप्पर असे कोसळून पडले. 

लाखाहून अधिक जणांना हलविले 

  • चक्रीवादळाच्या तडाख्यापूर्वी एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 
  • खाद्यपदार्थांची २५ हजार पाकिटे तयार ठेवली आहेत. राज्याच्या इतिहासातील अशा प्रकारच्या सर्वांत मोठ्या ऑपरेशनपैकी हे एक आहे. 
  • कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, भावनगर, बनासकांठा आणि मोरबी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. 

राजस्थानात ‘रेड अलर्ट’ 

जयपूर : बिपोरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये तडाखा दिल्यानंतर, आता हे चक्रीवादळ वाळवंटी राजस्थानकडे सरकले आहे. राजस्थानमधील जालोर आणि बारमेर जिल्ह्यांतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळGujaratगुजरातRajasthanराजस्थान