शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

चिडी मारण्याची बंदुकी दिली, वाघ मारण्याची अपेक्षा कशी करता? गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी : गिरीश महाजनांच्या आड येणार्‍यांचा सत्यानाश होईल

By admin | Published: October 16, 2016 9:27 PM

जळगाव : सहकार खात्याचा मंत्री असलो तरी माझ्याकडे फार काही देण्यासारखे नाही. सकाळी उठल्याबरोबर ठेवीदार दारात उभे राहतात. कर्जाचे पुनर्गठनासाठीच्या निधीबाबत विचारणा होते. माझ्या हातात चिडी मारण्याची बंदुक दिली मात्र जनता माझ्याकडून वाघ मारण्याची अपेक्षा करीत असल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आड येणार्‍यांचा सत्यानाश व्हावा असा नारा देखील त्यांनी आपल्या भाषणात दिला.

जळगाव : सहकार खात्याचा मंत्री असलो तरी माझ्याकडे फार काही देण्यासारखे नाही. सकाळी उठल्याबरोबर ठेवीदार दारात उभे राहतात. कर्जाचे पुनर्गठनासाठीच्या निधीबाबत विचारणा होते. माझ्या हातात चिडी मारण्याची बंदुक दिली मात्र जनता माझ्याकडून वाघ मारण्याची अपेक्षा करीत असल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आड येणार्‍यांचा सत्यानाश व्हावा असा नारा देखील त्यांनी आपल्या भाषणात दिला.
जामनेर येथील सभेच्या ठिकाणी गुलाबराव पाटील यांचे आगमन झाल्याबरोबर प्रेक्षकांमधून गुलाबरावांनी भाषण करावे अशी मागणी येऊ लागली. भाषणासाठी गुलाबराव माईकजवळ आल्यानंतर प्रेक्षकांनी एकच घोषणाबाजी सुरु केली.

गिरीश महाजन यांनी जिल्‘ाचा विकास करावा
टपरीवाला आमदार म्हणून गिरीश महाजन व आपली सारखीच ओळख. कार्यकर्त्यांना प्रेम देणारा माणूस म्हणजे गिरीश भाऊ आहे. त्यांनी जामनेर तालुक्याचा विकास करून इतिहास घडविला आहे. मात्र त्यांनी आता केवळ जामनेरचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्याचा विकास करावा असे आवाहन केले.

१०० कोटी दिल्यास आमचे नंदनवन होईल
जलसंपदा मंत्र्यांनी वाघूर धरणाला पैसे दिले. निम्न तापी व शेळगाव बॅरेजच्या कामाला देखील गती दिली आहे. जामनेरसह जळगाव ग्रामीणला संजीवनी देणार्‍या भागपूर प्रकल्पासाठी १०० कोटीच्या निधीची तरतूद केल्यास आमच्या भागात देखील नंदनवन येईल अशी अपेक्षा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
तुमच्या लग्नात माझा साखरपुडा
जामनेरमध्ये विकासकामांचा धडाका सुरु असल्याने तुमचे लग्न सुरु आहे. जादा निधी मिळवित तुमच्या लग्नात आमचा साखरपुडा करून घ्यावा असा विचार सुरू आहे. मतदारसंघाला निधी मिळावा यासाठी परमार्थाबरोबर थोडा स्वार्थ साधत असल्याचे गुलाबरावम्हणाले.
सकाळी उठलो की ठेवीदारांची भेट होते
सकाळी झोपेतून उठलो की पहिली भेट ही ठेवीदारांची होते. जिल्ह्यातील ठेवीदारांची ४१७ कोटी रुपयांची देणी आहेत. ठेवीदार व शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी मदत मिळावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. असे झाल्यास गिरीशभाऊच्या विकासाच्या इंजिनला गुलाबरावचा डब्बा जोडला जाईल असे सांगताच सभास्थळी हास्यकल्लोळउडाला.
...त्यांचा सत्यानाश होवो
गिरीशभाऊ हे पैशांनी श्रीमंत नाहीत मात्र माणसे जोडणारा आणि मनाने मोठा असलेला माणूस आहे. त्यांच्या आड जो कुणी येईल त्याचा सत्यानाश होईल असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी महाजन विरोधकांना लगावला.