शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

बिर्ला कुटुंबीयांना अमेरिकेत हॉटेलातून काढले बाहेर, परराष्ट्र मंत्रालयाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 5:40 AM

Ananya Birla News : कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या  या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत.

नवी दिल्ली : देशातील आघाडीचे उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांची कन्या आणि गायिका अनन्या हिने त्यांच्या कुटुंबाला अमेरिकेत वर्णद्वेषी वागणूक देण्यात आल्याचा आरोप ट्वीटद्वारे केला आहे. वॉशिंग्टन येथील स्कोपा इटालियन रूटस्‌ या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये २४ ऑक्टोबर रोजी बिर्ला कुटुंब भोजनासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तिने म्हटले  आहे. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विदेश मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या  या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत. विशेष म्हणजे, ट्वीटमध्ये तिने स्कोपा रेस्टॉरंटलाही टॅग केले आहे. तथापि, रेस्टॉरंटने याबाबत ट्विटरवर उत्तरादाखल चकार शब्दही काढलेला नाही. अनन्या ट्वीटमध्ये म्हणते, ‘स्कोपा रेस्टॉरंटने मला आणि माझ्या कुटुंबाला अक्षरश: बाहेर हाकलले. अत्यंत वर्णद्वेषी. खूपच वेदना झाल्या. ग्राहकांशी असंच वागतात का? हे बिलकूल खपवून घेतले जाऊ शकत नाही.’ दुसऱ्या ट्वीटमध्ये ती म्हणते, ‘आम्हाला जेवणासाठी तीन तास वाट बघावी लागली. शेफ एंटोनियो आणि वेटर जोशुआ सिल्‍वमन यांनी माझ्या आईला खूप वाईट वागणूक दिली. कमालीचा वर्णद्वेष. हे योग्य नाही.’ हे स्‍कोपा रेस्टॉरंट कॅलिफोर्नियात आहे आणि त्याचे शेफ एंटोनियो लोफासो आहेत. नीरजा बिर्ला यांनी अनन्याच्या ट्वीटला रिट्वीट करीत घटनेला दुजोरा दिला. त्यांनी लिहिले, ‘स्कोपाने आमच्याशी खूपच असभ्य वर्तन केले. कोणत्याही ग्राहकाला अशी अभद्र वागणूक देण्याचा तुम्हाला अधिकार नाही.’ आर्यमन यानेदेखील रिट्वीट करीत लिहिले की, ‘याआधी मला कुठेही असा अनुभव आला नाही. जगात अजूनही वर्णभेद कायम आहे. विश्वास बसत नाही.’ अनन्याच्या ट्वीटला करणवीर बोहरा आणि रणविजय सिंह या सेलिब्रिटींनीही रिट्वीट केले आहे.  

स्कोपा रेस्टॉरंटकडून इन्कारअमेरिकन प्रसारमाध्यमांनी स्कोपा रेस्टॉरंटची बाजू प्रकाशित केली आहे. त्यानुसार, स्कोपाने अशी काही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. ओळखपत्र दाखवण्यावरून वाद झाला होता. मात्र, नंतर सगळे ठीक झाले. ते जेवण करून गेले. केंद्राने माहिती मागविलीयासंदर्भात सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतरच पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय विदेश मंत्रालयाने घेतला आहे. सध्या अमेरिकन दूतावासाकडून घटनेची इत्थंभूत माहिती घेतली जात आहे.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार