हरीश गुप्ता, नवी दिल्लीराहुल गांधींच्या कार्यपद्धतीबद्दल गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेला असंतोष माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या राजीनाम्यामुळे अधिक प्रकाशातआला आहे. दिल्लीतील निवडणुकीच्या रणधुमाळीत नटराजन यांनी राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला केल्यामुळे भाजपच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असतानाच काँग्रेसने हल्ल्याची तीव्रता कमी करण्यासाठी धुरीणांना कामाला लावले आहे.तामिळनाडू प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी जी.के. वासन यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी नटराजन यांनी ज्या पद्धतीने वैयक्तिक हल्ला केला त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाला जबर धक्का बसला आहे.नटराजन यांचा हल्ला परतवून लावत त्यांचा सुप्त हेतू उघड करण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केले आहे. नटराजन या भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्कात असल्याचा आरोपही काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. जयंती नटराजन यांच्या मंत्रालयात जयंती टॅक्स लागत होता, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी एकेकाळी केला होता. आता नटराजन यांना भाजपा सामावून घेणार का, हा प्रश्न विचारला जात आहे.
जयंतींचा रोख राहुल गांधींवरच
By admin | Published: January 31, 2015 4:57 AM