शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बिस्मिल्ला खान यांच्या सनया नातवाने चोरल्या!

By admin | Published: January 11, 2017 4:12 AM

सनईचे जादूगार भारत रत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले

वाराणसी : सनईचे जादूगार भारत रत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या नातवाला आणि त्याच्याकडून या सनया विकत घेणाऱ्या दोन सोनारांना अटक केली आहे.या चोरीचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, बिस्मिल्ला खान यांचा नातू नझरे हसन उर्फ शदाब आणि शंकरलाल शेठ व त्यांचा मुलगा सुजित शेठ या दोन सोनारांना अटक करण्यात आली.पाठक म्हणाले की, नझरे हसन याने चार चांदीच्या सनया चोरल्याची कबुली दिली. या सनया वितळवून तयार केलेला एक किलो चांदीचा गोळाही हस्तगत करण्यात आला. या बदल्यात सोनाराने नझरे हसन यास १७ हजार रुपये दिले होते. बिस्मिल्ला खान यांचा मुलगा काझिम हुसैन यांच्या दालमंडी भागातील घरातून ही चोरी २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या पाच सनयांखेरीज खानसाहेबांना त्यांच्या चहात्यांनी दिलेली दोन सोन्याची कडी आणि इनायत खान पुरस्काराचे सन्मानचिन्हही चोरीला गेले होते. चार चांदीच्या सनया वगळून चोरीला गेलेल्या अन्य वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे. चोरून वितळविण्यात आलेल्या या चार चांदीच्या सनया बिस्मिल्ला खान यांना माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि मुंबईतील एक रसिक शैलेश भागवत यांनी भेट दिलेल्या होत्या. या सनया मुख्यत्वे शोभेच्या होत्या व उस्ताद त्या कधी कार्यक्रमांत वाजविण्यासाठी नेत नसत. मात्र पाचवी लाकडी सनई त्यांची खास पसंतीची सनई होती. तिला चांदीचा कर्णा होता व मुखाजवळली तिच्यावर चांदीची नक्षीदार पट्टी बसवलेली होती. दरवर्षी बिस्मिल्ला खान मुहर्रमच्या मिरवणुकीत हिच सनई वाजवायचे.ज्या महान कलावंताने सनईसारख्या मंगलवाद्यास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून दिगंत कीर्ति मिळवून दिली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीने त्यांच्या सनया चोरून त्या वितळवून टाकण्याचा नतद्रष्टेपणा करावा, याबद्दल संगीतप्रेमींमध्ये कमालीची चीड व्यक्त करण्यात येत आहे. उस्तादांच्या जन्मशताब्दी वर्षातच हे घडावे याची विशेष बोंच रसिकमनाला लागली आहे. (वृत्तसंस्था)संग्रहालय राहून गेलेबिस्मिल्ला खान हे संपूर्ण देशाचे भूषण असल्याने सरकारने त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे व त्यांच्याशी संबंधित इतर निवडक वस्तू ताब्यात घेऊन त्यांचे संग्रहालय करावे, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय गेली १० वर्षे करीत आहेत. या सनया, सोन्याची कडी व इनायत खान सन्मानचिन्ह चोरीला गेल्यानंतर कुटुंबाकडे आता ‘अब्बाजीं’चे भारत रत्न, पद्मश्री व अन्य काही पदके व सन्मानचिन्हे शिल्लक राहिली आहेत.