जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 59 लाख 20,258 इतका झाला आहे. त्यापैकी 25 लाख 92,085 रुग्ण बरे झाले असून 3लाख 62,365 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 65,829 वर पोहोचला आहे. त्यापैकी 71 हजार 106 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 4713 रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे. सद्यपरिस्थिती पाहता देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. अशात मेरठ येथून एक धक्कादायक बाब समोर येत आहे.
मेरठ येथील मेडिकल महाविद्यालयातून माकडांच्या टोळीनं कोरोना रुग्णांच्या चाचणीचे सॅम्पल घेऊन पळ काढला आहे. TimesNow नं असं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मेरठ मेडिकल कॉलेज येथे कोरोना रुग्णांचे सॅम्पल घेऊन कर्मचारी जात असताना माडकांच्या टोळीनं त्याच्यावर हल्ला केला आणि कर्मचाऱ्याच्या हातातील सॅम्पल घेऊन पळाला. एक माकड तर ते सॅम्पल तोंडात घेऊन चावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे आता कोरोनाचा मेरठमधील लोकं घाबरली आहेत.
यापूर्वी असा प्रकार येथे कधी घडलाच नव्हता. त्यामुळे स्थानिकांसह वैद्यकिय कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. ही माकडं मेरठमध्ये सर्वत्र फिरत असतात अशात त्यांच्या या कृतीनं मेरठमध्ये कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे मेरठ मेडिकल महाविद्यालयाच्या डिननं सांगितलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!
भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी
सोशल अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल; पाकिस्तानी गोलंदाज ट्विटवर होतोय ट्रेंड!
हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज
भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला!; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर
हजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video