कटक : काँग्रेस व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (बीजेडी) हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या राज्याचा विकास करण्यात हे पक्ष अपयशी ठरले आहेत, अशी टीका भाजपाध्यक्षअमित शहा यांनी मंगळवारी केली.कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शहा म्हणाले की, ओडिशातील जनतेने काँग्रेस व बीजेडीवर दाखविलेला विश्वास या पक्षांना सार्थ करून दाखविता आला नाही. आगामी विधानसभा निवडणुकांत जनतेने भाजपाला विजयी करावे. आम्ही ओडिशाला देशातील पहिल्या क्रमांकाचे प्रगत राज्य बनवू. केंद्राने राबविलेल्या आयुष्मान योजनेत सहभागी होण्यास पटनायक सरकारने नकार दिला. यामुळे पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता ओडिशात आणखी वाढेल अशी भीती या सरकारला वाटली असावी. मात्र या संकुचित वृत्तीमुळे जनतेला केंद्राच्या योजनांचे फायदे मिळेनासे झाले आहेत. येथील लोक अतिशय कष्टाळू आहेत. तिथे अनेक संसाधनेही आहेत. मात्र तरीही राज्याचा विकास होत नाहीयाला काँग्रेस, बीजेडी कारणीभूत आहेत. यूपीए सरकारने ओडिशाला ७९००० कोटींचा निधी मंजूर केला तर एनडीए सरकारने ५,१३,००० कोटींचा निधी दिला असेही शहा यांनी सांगितले.उडिया बोलणारा मुख्यमंत्री देऊमुख्यमंत्री नवीन पटनायक यांना उडिया भाषा नीट येत नसल्याने ते इंग्रजीतच बोलतात, असा उल्लेख करून अमित शहा म्हणाले की, ओडिशाचा पुढचा मुख्यमंत्री नीट उडिया भाषा बोलणारा असेल.
बीजेडी, काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू; अमित शहा यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 6:00 AM