नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण हे जनसेवेपेक्षा सत्ता, प्रसिद्धी आणि संपत्ती मिळण्याचे साधन बनले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी राजकारणात प्रवेश करण्याची संधी शोधत असतात. मात्र ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे. तथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव असून, बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेकजण अखेरच्या श्वासापर्यंत पदाला चिकटून राहतात. मात्र प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेला असूनही सत्पथी यांनी राजकारण सोडून आपला मूळ पेशा असलेल्या पत्रकारितेकडे वळण्याचा निर्णय घेतला. तथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या. नंदिनी सत्पथी यांनी 14 जून 1972 ते 16 डिसेंबर 1976 या काळात ओदिशाचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते.
निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:35 PM
ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे.
ठळक मुद्देतथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेततथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या