शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
4
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, 6 दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
5
Adani News : अदानींच्या झोळीत बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी, वृत्तानंतर शेअरमध्ये जोरदार तेजी
6
Devayani Farande : फरांदे समर्थकांचे फडणवीसांना साकडे; माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन
7
क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण
8
Hyundai India Share Price : Hyundai IPO नं केली गुंतवणूकदारांची निराशा, पण ब्रोकरेज मात्र बुलिश; लिस्टिंगलाच दिलं 'इतकं' टार्गेट
9
अनिल देशमुख यांनी तुरुंगात लिहिले पुस्तक; लवकरच होणार प्रकाशन
10
Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन!
11
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
12
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
13
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
14
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
15
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
16
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
17
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
18
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
19
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
20
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?

लोकसभेच्या ३५० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य; २०२४च्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 7:16 AM

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या दोन दिवसीय मिनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विस्तारित मुख्यालयात प्रारंभ झाला. 

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. गरीब, शेतकरी, युवा व महिला भाजपचे लक्ष्य पूर्ण करण्याचे काम करतील. उमेदवारांच्या नावांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. 

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या दोन दिवसीय मिनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विस्तारित मुख्यालयात प्रारंभ झाला. 

२०२४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी, हा या बैठकीचा अजेंडा आहे. भाजपने २०२४मध्ये ३५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या गरीब, शेतकरी, महिला व युवक या चार जणांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मोदी यांची गॅरंटीची गाडी देशाच्या प्रत्येक गावात व शहरात फिरत आहे. ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

श्रीराम मंदिराचा मुद्दा देशभर गाजवणार अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी भाजपने अनेक दशके लढाई लढली, संघर्ष केला व आता मंदिरही भाजपमुळेच उभारण्यात येत आहे. त्यामुळे ५०० वर्षांत जे काम कोणी करू शकले नाही, ते मोदी सरकारने केले आहे, हे सर्वसामान्य जनतेत जाऊन सांगण्यात येणार आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही श्रीराम मंदिर हाच निवडणुकीचा मुद्दा बनविण्यात येणार आहे.

बूथ जिंकले तर निवडणूक जिंकली२०२४ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची सर्व भिस्त संघटन व कार्यकर्त्यांवर असेल. बूथ मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्रत्येक बूथ मजबूत करण्यात येणार आहे. पन्ना प्रमुख, पन्ना कमिटी  तयार करण्यात येणार आहे.   लोकसभा जागेसाठी वेगवेगळी रणनीती तयार केली जात आहे. २०१९मध्ये पराभूत झालेल्या जागा यावेळी जिंकण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू आहे.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभा