“ममता बॅनर्जी हुकुमशाह, किम जोंग उनसारखे सरकार चालवतायत”; भाजप-काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 02:50 PM2024-01-06T14:50:32+5:302024-01-06T14:50:50+5:30

TMC Vs BJP-Congress: रेशन घोटाळ्याप्रकरणी भाजप आणि काँग्रेसने ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

bjp and congress leaders criticised tmc mamata banerjee govt over ration scam | “ममता बॅनर्जी हुकुमशाह, किम जोंग उनसारखे सरकार चालवतायत”; भाजप-काँग्रेस आक्रमक

“ममता बॅनर्जी हुकुमशाह, किम जोंग उनसारखे सरकार चालवतायत”; भाजप-काँग्रेस आक्रमक

TMC Vs BJP-Congress: पश्चिम बंगालमध्ये रेशन घोटाळ्यावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. या घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्या यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कारवाईसाठी गेलेल्या ईडीच्या पथकाला स्थानिकांकडून मोठा विरोध करण्यात आला होता. वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. असे असले तरी १७ तासांच्या झाडाझडतीनंतर शंकर आध्या यांना अटक करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांना झालेल्या विरोधाबाबत भाजप आणि काँग्रेसनेममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते गिरिराज सिंह यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही राहिलेली नाही, असेच दिसत आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार चालवत आहेत. पश्चिम बंगलामध्ये किम जोंग उन यांचे सरकार आहे की काय, असा प्रश्न पडत आहे, अशी टीका गिरिराज यांनी केली. 

काँग्रेसचा वार, तृणमूलचा पलटवार

पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य राहिलेले नाही. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. टीएमसीशासित राज्यात अधिकाऱ्यांची हत्या झाली, तरी त्यात आता आश्चर्य वाटणार नाही, या शब्दांत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला. यावर तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी पलटवार केला. अधीर रंजन चौधरी हे भाजपचे एजंट आहेत, अशी टीका केली. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या घटनेची एनआयए मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तत्पूर्वी, शंकर यांच्या पत्नी बनगाव नगरपालिकेच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. तपासात सहकार्य करूनही त्यांच्या पतीला ईडीने अटक केली. हे एक मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. आध्या यांना ताब्यात घेताना केंद्रीय सुरक्षा दल आणि ईडी टीमला स्थानिक लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. 
 

Web Title: bjp and congress leaders criticised tmc mamata banerjee govt over ration scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.