भीमा-कोरेगाव हिंसाचाराला भाजपा आणि संघ जबाबदार- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 05:51 PM2018-01-02T17:51:59+5:302018-01-02T21:38:13+5:30
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत या प्रकाराला भाजपा आणि संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय समाजात दलित हे सर्वात खालच्या स्तराला राहावेत, अशी संघाची भावना आहे.
नवी दिल्ली- भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत या प्रकाराला भाजपा आणि संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय समाजात दलित हे सर्वात खालच्या स्तराला राहावेत, अशी संघाची भावना आहे. आधी उना, रोहित वेमुला आणि आता भीमा-कोरेगाव ही प्रकरणं याची उदाहरणं असून, यातून जातीयवादी शक्तींना चोख प्रत्युत्तर मिळालं आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारावरून संघ आणि भाजपाला राहुल गांधी यांनी खडे बोल सुनावले आहेत. दलितांनी कायम तळागाळातच राहावं काय ?, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी भाजपाला विचारला आहे.
A central pillar of the RSS/BJP’s fascist vision for India is that Dalits should remain at the bottom of Indian society. Una, Rohith Vemula and now Bhima-Koregaon are potent symbols of the resistance.
— Office of RG (@OfficeOfRG) January 2, 2018
भीमा-कोरेगावातल्या हिंसाचारात आतापर्यंत एकाला जीव गमवावा लागला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पबल आणि शिकरापूर गावांतील दोन गटांत हा वाद निर्माण झाला आहे. पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरच्या पुणे-अहमदनगर महामार्गावरील पेरणे फाट्याजवळ हा हिंसाचार उफाळून आला आहे.