भाजपाकडून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 32 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:55 PM2019-09-29T18:55:17+5:302019-09-29T18:58:57+5:30
भाजपाचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांच्या सहीद्वारे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा येथे विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यासोबतच विविध राज्यातील एकूण 62 मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने 32 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.
भाजपाचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांच्या सहीद्वारे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत उत्तर प्रदेश, बिहार, ओदिशा, छत्तीसगड, आसम, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, सिक्कीम आणि तेलंगण या राज्यांधील विधानसभा पोटनिवडणुकांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
Bharatiya Janata Party (BJP) releases list of 36 candidates for by-elections to the Legislative Assembly Constituencies of different states. pic.twitter.com/eDdQAcSsqa
— ANI (@ANI) September 29, 2019
भाजपाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 10 उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच, केरळ - 5, आसाम – 4, पंजाब -2, हिमाचल प्रदेश - 2, सिक्कीम -2, बिहार - 1, छत्तीसगड -1, मध्यप्रदेश -1, मेघालय -1, ओदिशा -1, राजस्थान -1, तेलंगणा -1 या भाजपाच्या पहिल्या यादीत समावेश आहे.