बियाणी चौकातील बॅनर काढण्यावरून वाद भाजप, सेना कार्यकर्त्यांची पोलिसांना धक्काबुक्की
By admin | Published: September 05, 2015 12:36 AM
अकोला: गुलजारपुर्यातील मनोज धुमने यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर ब्रजलाल बियाणी चौकात काही कार्यकर्त्यांनी लावले. हे बॅनर पोलिसांनी काढण्यास बजावल्यानंतर पोलीस आणि शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण निवळले. ही घटना रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास घडली.
अकोला: गुलजारपुर्यातील मनोज धुमने यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर ब्रजलाल बियाणी चौकात काही कार्यकर्त्यांनी लावले. हे बॅनर पोलिसांनी काढण्यास बजावल्यानंतर पोलीस आणि शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण निवळले. ही घटना रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. मनोज धुमने, जय वाडेकर यांच्यावर ३१ जुलै रोजी रात्री तलवार व लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला चढविला. यात धुमने यांचा मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून भाजप, सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी बियाणी चौकातील माजी नगरसेवक हरिभाऊ काळे यांच्या घरावर मोठे बॅनर लावले. त्या बॅनरवर आतापर्यंत मी, यापुढे तुम्ही...असा मजकूर लिहिलेला होता. हे बॅनर लावत असताना, कोतवाली पोलीस तेथे धडकले. त्यांनी बॅनर आक्षेपार्ह असल्याचे सांगून काढण्यास फर्मावले; परंतु कार्यकर्त्यांनी बॅनर हटविण्यास स्पष्ट नकार दिला. या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक सतीश ढगे, माजी नगरसेवक हरिभाऊ काळे, गजानन चव्हाण, बबलू उके, योगेश गीते, शशी चोपडे, हेमंत मिश्रा, बुंदेले आदी भाजप, सेनेचे कार्यकर्ते गोळा झाले. कार्यकर्त्यांनी बॅनरवर आक्षेपार्ह काहीच नसल्याने, बॅनर का काढावे, असा पोलिसांना सवाल केला. कार्यकर्ते ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. सेना, भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीसुद्धा झाली आणि नंतर त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. ही बाब अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांना कळल्यावर त्यांनी हस्तक्षेप कार्यकर्त्यांची समजूत घातली. अखेर पोलिसांनी चौकातील हे बॅनर काढून टाकले. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. (प्रतिनिधी) 00000000000000000000000