तुमच्याच पूर्वजांमुळे चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य, भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 15:03 IST2019-03-14T14:59:38+5:302019-03-14T15:03:45+5:30
भाजपानं दहशतवादी मसूद अझहर आणि चीनच्या प्रकरणावरून राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

तुमच्याच पूर्वजांमुळे चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य, भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार
नवी दिल्ली- भाजपानं दहशतवादी मसूद अझहर आणि चीनच्या प्रकरणावरून राहुल गांधींवर पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर आक्षेप नोंदवला आहे. जेव्हा देश दुःखात असतो, तेव्हा राहुल गांधी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात. राजकारणात नेहमीच अंतर ठेवलं पाहिजे. विरोध असतो आणि तो झालाही पाहिजे.
चीननं पुन्हा एकदा जुन्याच नीतीचा वापर केल्यानं राहुल गांधी खूश आहेत काय ?, राहुल गांधींचं ट्विट आता पाकिस्तानमध्ये हेडलाइन होईल. पाकिस्तानी मीडियामध्ये झळकलेली ट्विट आणि कमेंट पाहून राहुल गांधींना आनंद होतो आहे. तुमच्याच पूर्वजांच्या कारणास्तव चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.
Union Minister Ravi Shankar Prasad on Rahul Gandhi's tweet after China blocks India's bid to designate JeM Chief Masood Azhar as global terrorist in UNSC 1267 list: Would the Congress party adopt a different voice even in case of a cruel killer & a global terrorist Masood Azhar? pic.twitter.com/tDFIeRQfDz
— ANI (@ANI) March 14, 2019
मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव यावेळी अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्सनं ठेवला होता. चीन सोडल्यास इतर देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. चीनच्या या पावलामुळे भारतीय लोक दुःखी आहेत. रविशंकर म्हणाले, भारताला वेदना होत असताना राहुल गांधी आनंदी कसे असतात. चीन सोडल्यास पूर्ण जग भारताबरोबर आहे.
Insightful read on how Jawaharlal Nehru compromised India's interest with respect to UNSC. May be Rahul Gandhi should read before he tweets.
— BJP (@BJP4India) March 14, 2019
Excerpt from his letter dated Aug 2, 1955. Source: 'Letters for a Nation: From Jawaharlal Nehru to His Chief Ministers 1947-1963'. pic.twitter.com/eMthTobAO7
2009मध्ये यूपीए सरकार असतानाही चीननंही असाच नकाराधिकाराचा वापर केला होता. त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं ट्विट केलं होतं का, असा सवालही रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधीजी तुमचे चीनबरोबर सौहार्दाचे संबंध आहे. डोकलामच्या वादावेळीही तुम्ही चीनच्या दूतावासात गेला होतात. त्यावेळी तुम्ही भारताची परवानगीसुद्धा घेतली नव्हती. मानसरोवर यात्रेवेळीसुद्धा चीन दूतावासातील अधिकारी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक होते. तुमच्या या प्रभावाचा वापर तुम्ही मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी करायला हवा होता.