Atul Bhatkhalkar : "आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 10:31 AM2022-11-03T10:31:43+5:302022-11-03T10:39:51+5:30

BJP Atul Bhatkhalkar Slams Congress : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

BJP Atul Bhatkhalkar Slams Congress Over Gujarat Elections 2022 | Atul Bhatkhalkar : "आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

Atul Bhatkhalkar : "आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

googlenewsNext

गुजरातमध्ये राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते सतत रॅली आणि सभा घेत आहेत. काँग्रेसनेही आपला प्रचार सुरू ठेवला आहे. काँग्रेसचे बडे नेते गुजरातमध्ये क्वचितच जाताना दिसतात. पण याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी हैदराबादमध्ये बोलताना गुजरातच्या निवडणुकांचा मुद्दा मांडला. आम आदमी पार्टी (AAP) हा वेगळा पक्ष नाही, तो भाजपचाच मित्रपक्षच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) ची फ्रंट ऑर्गनायझेशन असलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेतून २०१२ मध्ये त्यांचा जन्म झाला, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. यावरून आता भाजपाने काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. 

"आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते" असं म्हणत भाजपा नेत्याने निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सत्ता प्राप्तीच्या लालसेपोटी काँग्रेस अशी बेताल वक्तव्य करून अधिकच गाळात रुतत चालली आहे... आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते... Congress ला चळ लागले आहे…" असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

“गुजरातमध्ये खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच"

"भाजपा आणि आम आदमी पक्षाचे मुद्दे आणि भाषा जवळपास सारखीच आहे. दोघेही कधी एकमेकांविरुद्ध बोलले तर तो केवळ दिखाव्यासाठी राजकीय हल्ला असतो. आम आदमी पार्टी मीडियामध्ये भरपूर जाहिराती देत ​​आहे, मीडियामध्ये आपच्या जाहिराती भरलेल्या आहेत. पण वास्तविकता काही औरच आहे. गुजरातमध्ये खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. आम आदमी पार्टी काँग्रेसची मते कमी करण्यासाठी आणि भाजपाला मदत करण्यासाठीच आपले उमेदवार उभे करत आहे," असा दावा जयराम रमेश यांनी केला.

"एमआयएम म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून भाजपची बी-टीम”

जयराम रमेश यांनी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM)बाबतही रोखठोक भूमिका मांडली. ओवेसींचा पक्ष भाजपसाठी काम करतो. एमआयएम म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून भाजपची बी-टीम आहे. भाजपाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत मिळते आणि त्यावर त्यांची संघटना मजबूत केली जाते, असा आरोप त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षाला ज्या प्रकारे जनसमर्थन मिळत आहे, त्यावरून जनतेची काँग्रेस पक्षाप्रती असलेली ओढ सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर राज्यस्तरीय वैयक्तिक दौरे काढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आसाम आणि ओडिशा पासून सुरुवात करून त्यानंतर ते पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्येही अशा रॅली काढल्या जाणार आहेत. त्यातून विरोधकांसंबंधी माहिती देऊन जनजागृती केली जाईल," असा इशाराच त्यांनी दिला.
 

Web Title: BJP Atul Bhatkhalkar Slams Congress Over Gujarat Elections 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.