नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान आणखी एक माहिती समोर आली आहे. भाजपाच्या एका नेत्याने खळबळजनक दावा केला आहे. बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याचं म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या व्यक्तींचा पाकिस्तान आणि तेथील गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा दावा केला आहे.
बैजयंत जय पांडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. तसेच बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याचे काही पुरावे समोर आल्याचं देखील म्हटलं आहे. "बॉलिवूडमधील काही व्यक्तींचा काश्मीरमध्ये हिंसा पसरवणाऱ्या तसेच अनिवासी भारतीयांसोबत संबंध आहेत. हे संबंध दाखवणारी काही कागदपत्र समोर आली आहेत. काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि आयएसआयशी असलेले संबंध यामधून उघड होत आहेत" असं बैजयंत जय पांडा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"राम मंदिराच्या बांधकामाला सुरू होताच कोरोनाचा शेवट सुरू होईल"
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. एका बाजूला संशोधक कोरोनावरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असताना, त्यांच्या चाचण्यांसाठी अविरत प्रयत्न करत असताना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वेगळाच दावा केला आहे. अयोध्येत राम मंदिरासाठी (Ram Mandir Ayodhya) भूमिपूजन झालं, मंदिराच्या कामाला सुरुवात झाली की कोरोनाचा शेवट सुरू होईल, असं मध्य प्रदेश विधानसभा उपाध्यक्ष आणि भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं आहे.
'दानवांचा खात्मा करण्यासाठी आणि माणसांच्या कल्याणासाठी प्रभू रामांनी वेळोवेळी पुनर्जन्म घेतले आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा खात्मा सुरू होईल,' असा विश्वास शर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. 'भारतच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. आपण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत. याशिवाय आपल्या देवांचंही स्मरण करत आहोत,' असं ते पुढे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू
"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात
चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी
CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका
CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती