“लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार”; भाजप नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 12:01 PM2023-06-26T12:01:36+5:302023-06-26T12:02:10+5:30

Karnataka Politics Congress Vs BJP: आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील सर्व २८ जागा जिंकून देऊन परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहाती देशाची सुत्रे द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

bjp basangouda patil yatnal claims congress government in karnataka to collapse before lok sabha election 2024 | “लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार”; भाजप नेत्याचा मोठा दावा

“लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार”; भाजप नेत्याचा मोठा दावा

googlenewsNext

Karnataka Politics Congress Vs BJP: भाजपचा दारुण पराभव करत काँग्रेसने कर्नाटकात सत्ता स्थापन केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्रातील सांगली येथे झालेल्या काँग्रेसच्या  महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळाव्यात सहभाग नोंदवला. यावेळी भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन सिद्धरामय्या यांनी केले. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार असल्याचा मोठा दावा भाजप नेत्याने केला आहे. 

काँग्रेस सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲक्सिटेंड (अपघात) होऊन सरकार पडेल, असा दावा विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला. बेळगाव येथील गांधी भवनमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या सभेला उद्देशून ते बोलत होते. सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. तर दुसरीकडे डी. के. शिवकुमार शांत बसणार नाहीत, असा दावा यत्नाळ यांनी केला. 

गॅरंटी योजनांची हमी देणे शक्य नाही

गॅरंटी योजनांची इतिश्री झाली आहे. गॅरंटी योजनांची हमी देणे शक्य नाही. कोणतेही सरकार सत्तेत आले तरी त्यांना गॅरंटी योजना राबविता येणार नाहीत. गॅरंटी योजनेमुळे कर्नाटकामध्ये अराजकता सुरू झाली आहे. या स्वरुपाच्या घोषणा बसवराज बोम्मई यांनाही जाहीर करता आल्या असत्या. मात्र, ज्या गोष्टींची कार्यवाही शक्य नाही, त्याची घोषणा न करणे योग्य आहे, असे यत्नाळ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून २८ पैकी २८ जागा जिंकून देऊन परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहाती देशाची सुत्रे द्यावी, असे आवाहन यत्नाळ यांनी केले. विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे, म्हणून घरामध्ये बसून कसे चालेल. आपण सर्वांनी मिळून आजपासून काम सुरु करून पक्षाला परत सत्तेत आणावे, असेही ते म्हणाले.


 

Web Title: bjp basangouda patil yatnal claims congress government in karnataka to collapse before lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.