शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आगामी निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, जाहीर केली निवडणूक प्रभारींची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 12:33 PM

Upcoming assembly election: भाजपने यूपीसाठी 8 केंद्रीय मंत्र्यांना तैनात केले आहे.

नवी दिल्ली: पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाने बुधवारी पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सर्वात महत्वाच्या अशा उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. भाजपने प्रधान यांच्यासह 8 केंद्रीय मंत्र्यांना यूपीमध्ये तैनात केले आहे. तर, पंजाबची जबाबदारी कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना देण्यात आली आहे.

भाजपने प्रधान यांना उत्तर प्रदेशात प्रभारी केले आहे, तर अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, सरोज पांडे, शोभा करंदजले, कॅप्टन अभिमन्यू, अन्नपूर्णा देवी आणि विवेक ठाकूर यांना सह-प्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबमध्ये शेखावत महत्त्वाची जबाबदारी घेतील आणि त्यांच्यासोबत हरदीप पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा असतील. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उत्तराखंडचे मुख्य प्रभारी असतील. लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आरपी सिंह सह-प्रभारीच्या भूमिकेत असतील. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्यात आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मणिपूरमध्ये प्रभारी असतील.

भाजपसाठी यूपी तर काँग्रेससाठी पंजाब महत्वाचेअंदाज लावला जातोय की, निवडणूक आयोग मार्च ते एप्रिल 2022 दरम्यान विधानसभा निवडणुका घेऊ शकतो. 2017 मध्ये भाजपने हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये विजय मिळवला होता. तर काँग्रेसने पंजाब आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले. पंजाबमध्ये पक्षातील अंतर्गत कलहामुळे काँग्रेस अडचणीत आहे. तर, कृषी कायद्यांमुळे भाजपला पंजाबमध्ये विरोधाला सामोरे जावे लागत आहे. 

यूपीती शेतकरी नाराजभाजप शासित उत्तर प्रदेशातील पश्चिम उत्तर प्रदेशातही शेतकऱ्यांची नाराजी जाणवत आहे. यामुळेच भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पकषाने लोकसभा खासदार संजय भाटिया, ब्रिजचे आमदार संजीव चौरसिया, अवधचे सत्य कुमार, कानपूरचे सुधीर गुप्ता, गोरखपूरचे अरविंद मेनन यांना संघटन प्रभारी नेमले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहUttar Pradeshउत्तर प्रदेशgoaगोवाPunjabपंजाब