ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 05:40 PM2018-12-30T17:40:56+5:302018-12-30T17:42:28+5:30

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

'BJP a benefactor and protector of AgustaWestland', says Surjewala | ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल

ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल

Next

नवी दिल्ली- अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काल केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. चोराच्या उलट्या बोंबा, असं जावडेकर काँग्रेसला उद्देशून बोलले होते. त्यानंतर आज काँग्रेसनंही भाजपावर निशाणा साधला आहे. सरकारनं अगुस्ता वेस्टलँड या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर का काढलं, मोदी सरकार अगुस्ता वेस्टलँड हा कंपनीचे हितचिंतक आहेत काय, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. मोदी सरकारनं अगुस्ता वेस्टलँड या कंपनीला काळ्या यादीतून हटवून मेक इन इंडियाचा एका भाग बनवलं.

मोदी सरकारनं स्वतःची कपटी रणनीती लपवण्यासाठीच मोदी बचावचा नारा दिला आहे. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात 12 फेब्रुवारी 2013 रोजी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारनं चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. आता हाच मुद्दा घेऊन काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार अगुस्ता वेस्टलँड कंपनीचे हितचिंतक आहेत, मोदी सरकारनं 100 नौसैनिक हेलिकॉप्टरसाठी बोली लावण्यास अगुस्ता वेस्टलँडसारख्या ब्लॅकलिस्टेड कंपनीला परवानगी कशी दिली ?, असा प्रश्नही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

 27 फेब्रुवारी 2013मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी जेपीसीच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु भाजपानं त्याकडे दुर्लक्ष केलं. मोदी सरकार यांनी अगुस्ता वेस्टलँड आणि त्यांचं स्वामित्व असलेली फिनमेकॅनिका कंपनीला ब्लॅकलिस्टमधून का हटवलं, असा प्रश्नही काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

Web Title: 'BJP a benefactor and protector of AgustaWestland', says Surjewala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.