Gandhinagar Municipal Corporation Election Result 2021: BJP ने उडवला धुरळा! गांधीनगर निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ; ४४ पैकी ४० जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 02:49 PM2021-10-05T14:49:44+5:302021-10-05T14:55:55+5:30

Gandhinagar Municipal Corporation Election Result 2021: या निवडणुकीत काँग्रेस केवळ तीन तर आम आदमी पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

bjp big win in gujarat gandhinagar municipal corporation election result with 40 seats | Gandhinagar Municipal Corporation Election Result 2021: BJP ने उडवला धुरळा! गांधीनगर निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ; ४४ पैकी ४० जागांवर विजय

Gandhinagar Municipal Corporation Election Result 2021: BJP ने उडवला धुरळा! गांधीनगर निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ; ४४ पैकी ४० जागांवर विजय

Next
ठळक मुद्दे४४ पैकी तब्बल ४० जागांवर भाजप विजयीकाँग्रेसचा तीन तर आपचा एका जागेवर विजयगांधीनगर पालिका निवडणुकांमध्ये रविवारी मतदान झाले

गांधीनगर: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी हिंसाचाराप्रकरणी भाजप, योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली असताना दुसरीकडे मात्र गांधीनगर येथील पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) स्पष्ट बहुमत मिळाले असून, ४४ पैकी तब्बल ४० जागांवर विजय मिळाला आहे. (bjp big win in gujarat gandhinagar municipal corporation election result with 40 seats)

गांधीनगरमध्ये एकूण ११ वॉर्डमधील एकूण ४४ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसने सर्व ४४ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर आम आदमी पक्षाने ४० जागांवर उमेदवार दिले होते. त्यामुळे ही लढत त्रिकोणी होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, भाजपने काँग्रेस आणि आपला धोबीपछाड देत दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेस केवळ तीन तर आम आदमी पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

रविवारी झाले होते मतदान

गांधीनगर पालिका निवडणुकांमध्ये रविवारी मतदान पार पडले. यावेळी ५६.२४ टक्के मतदान झाले. गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. भुपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिली निवडणूक असली तरी भाजपने मिळवलेला विजय महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणूक निकाल हाती आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. विशेष म्हणजे या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माता हीराबेन यांनीही मतदानाचा हक्क बजावला होता. 

दरम्यान, सन २०११ मध्ये गांधीनगर पालिकेत काँग्रेसची सत्ता होती. या पालिकेत काँग्रेसच्या १८ तर भाजपच्या १५ जागा होत्या. त्यानंतर सन २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला १६ जागा मिळाल्या होत्या. तर यंदा २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला चितपट करत भाजपने दणदणीत विजय मिळवल्याचे पाहायला मिळत आहे. 
 

Web Title: bjp big win in gujarat gandhinagar municipal corporation election result with 40 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.