शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाच राज्यांत उमेदवार देण्यावरून भाजपचे मंथन; दिल्लीत महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 5:47 AM

निवडणूक समितीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांविषयी चर्चा होणार आहे. मध्य प्रदेशातील उमेदवारांच्या दोन आणि छत्तीसगडमधील एक यादी जाहीर झाली आहे. मात्र, भाजपचे तीन केंद्रीय नेते दोन दिवस जयपूरला जाऊनही उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकलेली नाही.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सरचिटणीस बी. एल. संतोष हे राजस्थान, मध्य प्रदेशसह इतर तीन राज्यांच्या आगामी निवडणुकीसाठीची रणनीती तयार करण्यासाठी जयपूरमध्ये होते. मात्र, विधानसभांच्या या निवडणुकांत केंद्रीय मंत्री, लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसह सर्व प्रमुख नेत्यांना उभे करायचे की नाही याबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. तसेच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनाही उमेदवारी द्यायची की नाही, याबाबतही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, केंद्रीय नेत्यांनी सर्वांची स्वतंत्रपणे आणि एकत्र भेट घेतली आहे. पक्षाचा चेहरा म्हणून स्थान मिळत नसल्याने वसुंधरा राजे या नाराज आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि अर्जुन राम मेघवाल यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न हायकमांडने चालवले आहेत. याशिवाय, खासदार डॉ. किरोडीलाल मीना, दिया कुमारी, राजवर्धन राठोड आणि सुखवीर सिंग जौनपुरिया हे देखील प्रमुख पदांच्या शर्यतीत आहेत.

दरम्यान, वसुंधरा राजे यांना प्रोजेक्ट करावे अशी हायकमांडची मन:स्थिती नाही. मात्र, दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या सिंधीया यांना नाराज करणेही शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय समितीच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या यादीवर चर्चा होऊ शकते.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या निवडणुकांची घोषणानिवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कधीही पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत व डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या सर्व राज्यांत नवी सरकारे स्थापन होतील. निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना सणवारांच्या तारखाही लक्षात घ्याव्या लागत आहेत. दसरा, दिवाळी, छठ पूजेसह अनेक महत्त्वाचे सण या काळात येणार आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाElectionनिवडणूक