हिंदू असाल तर आम्हाला मत द्या, मुसलमान असाल तर काँग्रेस उमेदवाराला द्या; भाजपा मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 08:57 AM2018-01-10T08:57:22+5:302018-01-10T08:58:12+5:30

पुन्हा एका भाजपाच्या मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

bjp candiadate jaswant singh yadav of alwar bypoll controversial comment on religion | हिंदू असाल तर आम्हाला मत द्या, मुसलमान असाल तर काँग्रेस उमेदवाराला द्या; भाजपा मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

हिंदू असाल तर आम्हाला मत द्या, मुसलमान असाल तर काँग्रेस उमेदवाराला द्या; भाजपा मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

googlenewsNext

जयपूर- भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता पुन्हा एका भाजपाच्या मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. भाजपाचा हा मंत्री राजस्थानमधील आहे. अलवर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे उमेदवार आणि राजस्थानचे श्रम व नियोजन मंत्री डॉ. जसवंत यादव यांचा एक व्हिडिओ समोर आला असून यात ते एका सभेत बोलताना दिसत आहेत. तुम्ही हिंदू असाल तर मला मत द्या, जर तुम्ही मुसलमान असाल तर काँग्रेसचे उमेदवार करणसिंह यांना मतदान करा, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे मंत्री जसवंत यादव यांनी केलं आहे. यादव यांचं हे वक्तव्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यादव यांच्या वक्तव्यामुळे राजस्थानमध्ये भाजपावर टीका केली जातीये. 

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ अलवर लोकसभा मतदारसंघातील एका गावातील आहे.'मी मेवातमधील काही गावांमध्ये गेलो होतो. तेथील लोकांनी माझं स्वागत केलं. मेव समाजातील लोकांनी मला मत देऊ पण भाजपाला मत देणार नसल्याचं म्हटलं. मी त्यांना विचारलं की, असं का?, तर ते म्हणाले, भाजपा तर हिंदूंचा पक्ष आहे. मग मी म्हटलं की, जर हिंदू असाल तर मला मत द्या, मुसलमान असाल तर डॉ. करणसिंह यांना मतदान करा', असं डॉ. जसवंत यादव या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. 

येत्या २९ जानेवारी रोजी राजस्थानमधील अलवर आणि अजमेर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही जागांवर भाजपाचे खासदार होते. अलवरमधून महंत चांदनाथ आणि अजमेरमधून सांवरलाल जाट निवडून आले होते. दोघांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, यादव यांच्या या वक्तव्यामुळे राजस्थानात भाजपावर टीका होत आहे. 

Web Title: bjp candiadate jaswant singh yadav of alwar bypoll controversial comment on religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.