हैदराबाद - एमआयएमचे नेते खासदार असुदूद्दीन औवेसी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून आसुदूद्दीन यांनी आपले खासदार पद कायम राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतील पहिल्या फेरीत ओवैसी पिछाडीवर गेले होते. हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. भगवंत राव आघाडीवर होते.
कोंग्रेसने हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून फिरोज खान यांना उमेदवारी दिली आहे. गतवर्षी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आसुदूद्दीन औवेसी यांनी 513868 मते मिळवली होती. औवेसी यांनी भगवंत राव यांचा पराभव केला होता. भगवंत राव यांना 202454 मते मिळाली होती. 2014 मध्ये एकूण 53.3 टक्के मतदान झाले होते. तेलंगणा राज्यातून लोकसभेच्या 17 जागा आहेत. या 17 मतदारसंघपैकी हैदराबाद लोकसभा मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. यंदाही येथून औवेसी यांचाच विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, पहिल्या फेरीनंतर राव यांनी आघाडी घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. मात्र, पुढच्या फेरीत औवेसी यांनी आघाडी घेतली असून औवेसी यांना 1,35,008 मते मिळाली आहेत. तर, भाजपाच्या भगवंत राव यांना 100814 मते मिळाली आहेत. त्यामुळे हैदराबाद लोकसभा मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेस उमेदवार फिरोज खान यांना 16635 मते मिळाली आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंतची ही निकलची आकडेवारी आहे.