शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
Loan EMI : केव्हा कमी होणार लोनचा EMI? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मोठं भाकीत
5
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
6
पितृपक्ष: पितृ पंधरवड्यातील ७ तिथी सर्वांत महत्त्वाच्या; पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
7
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
8
बजाज IPO घेण्याची संधी हुकली? 'या' बँकेचा शेअर पुढील 2-3 दिवसात होणार रॉकेट; ब्रोकर म्हणाले..
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
11
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
12
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
13
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
14
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
15
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
16
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
17
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
18
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
19
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
20
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू

हरियाणात भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दोन मुस्लिम चेहऱ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 4:24 PM

Haryana BJP Candidates Second List : दुसऱ्या यादीत २१ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

Haryana BJP Candidates Second List : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २१ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन मुस्लीम उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. आतापर्यंत भाजपने हरियाणातील ९० पैकी ८८ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहे. पहिल्या यादीत ६७ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. अद्याप दोन जागांवर उमेदवारी घोषित करणे बाकी आहे.

भाजपने फिरोजपूर झिरका मतदारसंघातून नसीम अहमद आणि पुन्हाणा मतदारसंघातून एजाज खान यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, जुलाना जागेवर भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर कुस्तीपटू विनेश फोगट काँग्रेसच्या तिकीटावर येथून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने पेहोवा जागेवर उमेदवार बदलला आहे. याआधी भाजपने कंवलजीत सिंह अजराना यांना तिकीट दिले होते. मात्र, विरोध असल्याने त्यांनी तिकीट परत केले. आता भाजपने या जागेसाठी जय भगवान शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ही यादी जाहीर झाल्यानंतर तिकीट मिळाले नाही, म्हणून भाजपचे अनेक नेते पक्षावर कमालीचेच नारज असल्याचे दिसून आले. तसेच, काही नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. निडणुकीपूर्वी नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पक्षाने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. हरियाणामध्ये एकूण ९० जागा आहेत. या ठिकाणी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 

भाजपच्या दुसऱ्या यादीतील मतदारसंघ आणि उमेदवार...- नारायणगड - श्री पवन सैनी- पेहोवा- जय भगवान शर्मा (डीडी शर्मा)- पुंडरी - सतपाल जांबा- असांध - योगेंद्र राणा- गणौर - देवेंद्र कौशिक- राई - कृष्णा गेहलावत- बरोदा - प्रदीप सांगवान- जुलाना - कॅप्टन योगेश बैरागी- नरवाना (SC)- कृष्णकुमार बेदी- डबवाली - सरदार बलदेवसिंग मलियाना- एलेनाबाद - अमीर चंद मेहता- रोहतक  - मनीष ग्रोवर- नारनौल -  ओम प्रकाश यादव - बावल (अजा) - डॉ. कृष्ण कुमार- पटौदी (अजा) - बिमला चौधरी- नूंह -  संजय सिंह- फिरोजपुर झिरका - नसीम अहमद- पुन्हाना - ऐज़ाज़ खान- हथिन - मनोज रावत- होडल (अजा) - हरिंदर सिंह रामरतन- बड़खल - धनेश अदलखा 

टॅग्स :Haryanaहरयाणा