शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बेळगावात भाजपने इतिहास बदलला, भाजपलाच का मिळाली सत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 10:07 IST

महापालिका निवडणुकीत ३५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत : महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ चार जागा : काँग्रेसला १० ठिकाणी यश

ठळक मुद्देमहापालिकेसाठी शुक्रवारी मतदान झाले होते.  मतमोजणी सोमवारी कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल येथे कडक पोलीस बंदोबस्तात  पार पडली.

प्रकाश बिळगोजीलोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत  ५८ पैकी ३५ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. यामुळे प्रथमच बेळगावचा महापौर हा एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा असणार आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसह अन्य पक्षांना अनुक्रमे १० व १३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

महापालिकेसाठी शुक्रवारी मतदान झाले होते.  मतमोजणी सोमवारी कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल येथे कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली. मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर आले. महापालिकेवर यापूर्वी सातत्याने वर्चस्व राखणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या चार जागा जिंकता आल्या.  काँग्रेसला १० जागांवर विजय मिळाला. ८ अपक्ष उमेदवार निवडून आले, तर एमआयएमने एक जागा जिंकून चंचूप्रवेश केला.महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रवी साळुंके, बसवराज मोदगेकर, वैशाली भातकांडे, शिवाजी मंडोळकर हे उमेदवार विजयी झाले असले तरी मराठी भाषिक ज्योती कडोलकर या काँग्रेसतर्फे विजयी झाल्या आहेत. याव्यतिरिक्त पूजा पाटील आणि शंकर पाटील या अपक्ष उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे.

पक्षीय चिन्हावर प्रथमच निवडणूकयापूर्वी बेळगाव महापालिका निवडणूक भाषिक मुद्यांवर लढविली जात होती. मात्र, यावेळी भाजप, काँग्रेस, निजद, आम आदमी, एमआयएम आदी राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने पक्षांच्या चिन्हांवर ही निवडणूक लढविली आणि त्यामध्ये भाजपची सरशी झाली.

महापालिकेत ५५ नवे चेहरे केवळ तीन माजी नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा संधी दिली असून, तब्बल  ५५ नव्या चेहऱ्यांना निवडून दिले आहे. यातील बहुतांश नगरसेवक तरुण आहेत. विशेष म्हणजे विजयी उमेदवारांमध्ये २२ मराठी आणि १४ मुस्लीम उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये १५ मराठी भाषिक आहेत.

का मिळालीभाजपला सत्ता? आरक्षणाबरोबरच अवैज्ञानिक प्रभाग पुनर्रचनेचा फायदा भाजपला मिळाला आहे. लोकसभा निवडणूक, तसेच अन्य राष्ट्रीय मुद्यांवर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेच्या मनोवृत्तीचाही लाभ भाजपला मिळाला आहे.

टॅग्स :belgaonबेळगावBJPभाजपा