UP Election 2022: “काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप, त्यांना मंदिरा जायलाही भीती वाटते”: भाजप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:50 PM2021-09-06T14:50:48+5:302021-09-06T14:56:23+5:30

UP Election 2022: अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्ता राखण्यात यशस्वी होतील, असे सांगितले गेले.

up bjp chief swatantra dev singh said voting for sp bsp congress sin | UP Election 2022: “काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप, त्यांना मंदिरा जायलाही भीती वाटते”: भाजप

UP Election 2022: “काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप, त्यांना मंदिरा जायलाही भीती वाटते”: भाजप

ठळक मुद्देकाँग्रेस, सप, बसप यांना मतदान करणे म्हणजे पापही लोकं मंदिरात जायला घाबरतात, भारत माता की जय म्हणायला घाबरतातभाजपचे टीकास्त्र

लखनऊ:उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर, अनेकविध पक्षांनी भाजपला पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्ता राखण्यात यशस्वी होतील, असे सांगितले गेले. आहे. यातच आता काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना मतदान करणे पाप असून, त्यांना मंदिरात जायलाही भीती वाटते, असा टोला भाजपने लगावला आहे. (up bjp chief swatantra dev singh said voting for sp bsp congress sin)

“मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

उत्तर प्रदेशमधील भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेस, सप, बसपवर जोरदार टीका केली आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप असल्याचे म्हटले आहे. यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. एका महिला कार्यसमितीला संबोधित करताना स्वतंत्र देव सिंह यांनी सदर विधान केल्याचे सांगितले जात आहे. 

“मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात

भारत माता की जय बोलायला घाबरतात

काँग्रेस, सप, बसप यांना मतदान करणे म्हणजे पाप आहे. ही लोकं मंदिरात जायला घाबरतात, भारत माता की जय म्हणायला घाबरतात, असे सांगत शेतकऱ्यांच्या पाठीवर बंदूक ठेवून विरोधी पक्ष आक्रमणकारी झाला आहे, असा आरोप स्वतंत्र देव सिंह यांनी केला आहे. दरम्यान, स्वतंत्र देव सिंह यांनी अलीकडेच सप नेते मुलायम सिंह यादव यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी मुलायम सिंह यादव यांनी स्वतंत्र देव सिंह यांना समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती मात्र, ती केवळ राजकीय चर्चाच ठरल्याचे सांगितले जात आहे.

“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार

दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. कारण यात एका अशा राज्याचाही समावेश आहे जेथे देशातील सर्वाधिक ८० लोकसभा जागा आहेत. भाजपला २०२४ मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेवर विराजमान व्हायचे असेल, तर तर त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा उंचावणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला २५९ ते २६७ जागा मिळू शकतात. तर समाजवादी पक्षाला १०९ ते ११७ जागा, बसपला १२ ते १६ जागा, काँग्रेसला ३ ते ७ जागा आणि इतरांना ६ ते १० जागा मिळू शकतात, असा दावा एबीपी न्यूज सी व्होटर सर्वेक्षणात करण्यात आला आहे. 
 

Web Title: up bjp chief swatantra dev singh said voting for sp bsp congress sin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.