शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
2
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
3
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
4
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
5
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
6
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
7
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
8
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
9
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
10
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
11
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
12
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
13
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
15
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
16
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
17
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
19
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
20
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 

2024 मध्येही भाजप सत्तेत असणार का? शशी थरूर यांनी मोठ्या विजयाचे केले भाकीत,पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 9:43 AM

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भारतीय जनता पक्षही संघटनेपासून सरकारपर्यंत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी 2024 मध्ये फक्त भाजपचेच सरकार स्थापन होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2019 च्या तुलनेत जागा जिंकणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला.  या तुलनेत भाजपच्या 50 जागा कमी होऊ शकतात, असंही थरुर म्हणाले.

शशी थरूर यांच्या दाव्यानुसार,2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 250 पेक्षा जास्त जागा मिळतील. एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करणे त्यांच्यासाठी अवघड काम असणार नाही. 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला केवळ 272 जागांची गरज आहे.

काल खासदार शशी थरुर यांनी अनंतपुरम येथे एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. '2019 मध्ये भाजपने चांगली कामगिरी केली होती. हरियाणा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथे त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. पश्चिम बंगाललाही 18 जागा मिळाल्या. आता त्या सर्व निकालांची प्रतिकृती करणे अशक्य आहे. 2024 मध्ये बहुमतापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, असंही थरुर म्हणाले. 

Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याचा संदर्भ देत शशी थरूर म्हणाले की, शेवटच्या क्षणी सरकारच्या बाजूने जबरदस्त लाट आली होती. 2024 मध्ये त्याची पुनरावृत्ती होणे शक्य नाही. विरोधी पक्षांना संधी मिळू शकते.

"जर भाजप 250 जागांवर थांबला, तर इतरांना 290 जागा मिळतील. भाजप वगळता इतर पक्ष 290 जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील की नाही हे आम्हाला माहित नाही." 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 303 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त 52 जागा जिंकता आल्या, असंही शशी थरुर म्हणाले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा