राफेलच्या पूजनावरून भाजपा-काँग्रेस आमनेसामने, पंडित नेहरूंचाही पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:04 AM2019-10-10T10:04:14+5:302019-10-10T10:05:54+5:30

भारतीय सैन्यदलाकडून कुठलेही नवे अस्त्रशस्त्र खरेदी केल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या सरकारी प्रकल्पाचे भूमीपूजन करताना नारळ, फुले वाहणे, पूजापाठ करणे काही नवी बाब नाही. मात्र...

bjp & congress face to face on rafale jet worshiping ; Pandit Nehru's Video viral | राफेलच्या पूजनावरून भाजपा-काँग्रेस आमनेसामने, पंडित नेहरूंचाही पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

राफेलच्या पूजनावरून भाजपा-काँग्रेस आमनेसामने, पंडित नेहरूंचाही पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

Next

नवी दिल्ली -  भारतीय सैन्यदलाकडून कुठलेही नवे अस्त्रशस्त्र खरेदी केल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या सरकारी प्रकल्पाचे भूमीपूजन करताना नारळ, फुले वाहणे, पूजापाठ करणे काही नवी बाब नाही. मात्र फ्रान्सकडून राफेल विमान ताब्यात घेताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विमानाच्या पुजनावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे.  राजनाथ सिंह यांनी राफेल विमानावर ओम काढत नारळ ठेवून विमानाची पूजा हा तमाशा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्याला आता भाजपाने प्रत्युत्तर देत काँग्रेस पक्ष भारतीय परंपरा आणि रीतीरिवाजांच्या विरोधी असल्याचा आरोप केला आहे. तसेच  देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जहाजाचे जलावतरण करताना पूजा करत असतानाचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये नेहरू हे नारळ वाढवून जहाजाचे जलावतरण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हा व्हिडिओ सय्यद अतहर देहलवी यांनी 14 मार्च 2018 रोजी ट्विट केला होता. 14 मार्च 1948 रोजी पंडित नेहरू यांनी स्वतंत्र भारतातील पहिले जहाज जल ऊषाचे जलावतरण वैदिक मंत्रोच्चार आणि विधिवत पूजा करून केले होते, असा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. दरम्यान, राफेल विमानाच्या पूजेवरून वाद निर्माण झाल्यानंतर सय्यद अतहर देहलवी यांनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. तसेच राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जे काही केले. त्यात नवीन असे काहीच नाही, असा दावा केला आहे.  



दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचेही एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रामध्ये मनमोहन सिंह यांची पत्नी गुरुशरण कौर हातात नारळ पकडून उभ्या आहेत. तसेच त्यांच्या शेजारी नौदलाचे काही अधिकारी उभे आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय संजोजक सरल पटेल यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. काँग्रेस भारतीय परंपरांचा किती आदर करते, हे दाखवण्याचा प्रयत्न या छायाचित्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या छायाचित्रासंदर्भात सरल पटेल सांगतात की, " हे छायाचित्र 2009 मधील छायाचित्र असून, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांची पत्नी गुरुशरण कौर यांनी नारळ वाढवून आयएनएस अरिहंतचे उदघाटन केले होते.'' 

Web Title: bjp & congress face to face on rafale jet worshiping ; Pandit Nehru's Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.