नितीन गडकरी अध्यक्ष असतानाच पार्टी मुख्यालयात बदलांना सुरुवात झाली होती. त्यांनी पार्टी मुख्यालयाला ‘कॉर्पोरेट लूक’ देण्यात मोठी भूमिका बजावली. पण आता मोदी-शाह जोडीने भाजपा मुख्यालयाच्या राजकारणाच्या कार्यशैलीत ‘कॉर्परेरेट कार्य संस्कृती’ जोडण्यास सुरुवात केली आहे. मागील 100 दिवसांत भाजपाचा चेहरा पूर्ण बदलला..
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
नव्वदच्या दशकात नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील 11 अशोक रोडवरील भाजपा मुख्यालयात पक्षाचे संगठन प्रभारी महासचिव म्हणून एका कोप:यात बसून असायचे. एक काळ असाही होता की गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी सरकारमधील गृह राज्य मंत्री अमित शाह 11 अशोक रोड येथील भाजपा मुख्यालयाला लागून असलेल्या अरुण जेटली यांच्या बंगल्यातील एका रूममध्ये शांतपणो बसलेले असायचे. मात्र आज भाजपा आणि सरकारवर या दोन्ही गुजरातींचे वर्चस्व आहे.
अमित शाहची नवी टीम आणि संसदीय बोर्डापासून केंद्रीय निवड समितीची निवडही काही अशाच प्रकारे करण्यात आली आहे, ज्यात मोदी आणि शाह यांचे वर्चस्व स्पष्टपणो दिसते. दुस:या बाजूने पाहिल्यास भाजपात अटल-अडवाणी यांचे युग संपले आहे. त्यांच्या जागी मोदी-शाह यांचे युग आले आहे. असे असले तरी आजही भाजपा मुख्यालयात मोदी-शाह यांच्या छायाचित्रंसह अटल-अडवाणी दिसतात. संघटनेत झालेल्या बदलांचा प्रभाव मुख्यालयातही पाहायला मिळतो. येथे मोकळेपणाची जागा सुरक्षा प्रणालीने घेतली. नव्या टीममधील पदाधिका:यांच्या कामाचे विभाजन झालेले नाही आणि त्यांची बसण्याची व्यवस्थाही झालेली नाही. भाजपा मुख्यालयासमोर अशोक रोडवर 9 ते 13 अशोक रोडर्पयत वाहन उभे करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हेच नव्हे, तर मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ट्राफिक सिग्नल लावण्यात आले आहेत. आत पूर्वी जेथे नेतेमंडळी व पदाधिका:यांच्या गाडय़ा पार्क होत, तेथे एक छोटा संमेलन कक्ष बनवलेला आहे. येथे बसूनच सोमवार ते शुक्रवार्पयत मोदी सरकारमधील एक-एक मंत्री कार्यकर्ता दरबार भरवतात. यात मंत्री कोणत्याही मंत्रलयासंदर्भातील तक्रारी, उपाय किंवा शिफारशींसंदर्भात कार्यकत्र्याचे म्हणणो ऐकून घेतात आणि संबंधित मंत्र्यांर्पयत पोहोचवतात.
बदलत्या परिस्थितीनुसार मीडियाच्या प्रतिनिधींना भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी साधे बोलणो तर दूरच त्यांची भेट घेणोही कठीण होऊन बसले आहे. भाजपा मीडियापासून अंतर ठेवून आहे. अमित शाह माध्यमांसमोर फक्त 3 ते 4 वेळा आले. निवडणुकीच्या आधी माध्यमांना बाईट देण्यात तप्तर असणारे नेते - प्रवक्तेही तात्पुरते अनौपचारिक बोलण्यास प्राधान्य देत आहेत. आपण माध्यमांशी खूप बोलतोय असे जर मोदी आणि शाह ना कळले तर आपले पद जाऊ शकते अशीही भीती त्यांना वाटते. माध्यम प्रतिनिधींसमोर भाजपाने एक सुरक्षाभिंत उभी केली आहे. वेळ दिलेली नसेल तर कोणाही नेत्याला इथे भेटू दिले जात नाही.