दिल्लीतल्या प्रदेश भाजपाच्या स्थानिक नेत्यांमधली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या गटबाजीमुळे वरिष्ठ नेत्यांवर जनतेसमोरच लाजिरवाणी परिस्थिती ओढावली आहे. भाजपामधले अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. दिल्लीतल्या किराडीमध्ये भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मंचावर उपस्थित होते. त्याचदरम्यान पार्टीच्या नगरसेविकांनी एकमेकांबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यात ही भाजपातील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे.दिल्लीतल्या किराडी भागात भाजपाकडून एका सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मंचावर दिल्लीतले भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय भाषण करणार होते. नगरसेवक पूनम आणि त्यांचे व किराडीचे भाजपाचे माजी आमदार अनिल झा यांनी सतीत उपाध्याय यांचं मंचावर स्वागत केलं. या स्वागतावर नगरसेविका ऊर्मिला चौधरी, नगरसेविका सोना चौधरी आणि त्यांचे पती रणजित चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही गटाच्या नगरसेवकांमध्ये मंचावरच बाचाबाची झाली.प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यासही सुरुवात केली. माजी आमदार अनिल झा यांनी आरोप केले की, माझ्या पत्नीबरोबर दुर्व्यवहार करण्यात आला. त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय सभेला संबोधित न करताच मंचावरून निघून गेले. त्यानंतर प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून, पक्षाच्या नेतृत्वाकडे यासंदर्भात तक्रारी केल्या आहे.
भाजपाच्या मंचावरच भिडल्या 3 महिला नगरसेविका, भाषण न देताच परतले माजी अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:35 AM