कोलकाता : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्सवरून (एनआरसी) भाजपने दहशत निर्माण केल्याचा आरोप सोमवारी करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआरसीमुळे राज्यात सहा जणांचा बळी गेल्याचा दावा केला. कामगार संघटनांच्या येथील बैठकीत बोलताना बॅनर्जी यांनी आम्ही राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही.बंगालमध्ये किंवा देशात कुठेही एनआरसी अंमलात येणार नाही. आसाममध्ये त्याची अंमलबजावणी झाली ती आसाम करारामुळे, असे त्या म्हणाल्या. १९८५ मध्ये राजीव गांधी यांचे सरकार आणि आॅल आसाम स्टुडंटस् युनियन यांच्यात ‘आसाम करार’ झाला होता.बांगला देशातून बेकायदेशीरपणे येऊन आसाममध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांविरुद्ध सहा वर्षे चाललेले आंदोलन या करारामुळे संपले होते.पश्चिम बंगालमध्ये एनआरसीवरून दहशत निर्माण करणाºया भारतीय जनता पक्षाचा धिक्कार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी राज्यात एनआरसी लागू करू देणार नाही, असे बॅनर्जी तपशील न देता म्हणाल्या.आसाममध्ये नुकतीच एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यातून १९ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. एनआरसीत नाव असणे हा भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आहे. देशात भाजप लोकशाही मूल्यांना सुरुंग लावत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.सरकारी मालकीच्या उपक्रमांचे खासगीकरण आणि ते बंद करण्याच्या निषेधार्थ देशभर १८ आॅक्टोबर रोजी मोर्चे निघणार आहेत आणि मी त्यात सहभागी होणार आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले. १९ सप्टेंबर रोजी जादवपूर विद्यापीठात जे काही झाले त्याचा संदर्भ देऊन बॅनर्जी म्हणाल्या की, अभाविप आणि भाजपने विद्यापीठात काय केले हे संपूर्ण बंगालने पाहिले आहे.भाजपला राजकीय हिताची चिंता‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे. परंतु देशाच्या अनेक भागांत तिला धोका निर्माण झाला आहे. भाजप नोकºया, रोजगार बुडाल्याबद्दल, देशाची अर्थव्यवस्था घसरत असल्याबद्दल काही बोलत नाही. त्याला फक्त त्याच्या राजकीय हिताची चिंता आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
'एनआरसीवरून भाजपने दहशत निर्माण केली'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:43 AM