शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

कर्नाटकमध्ये भाजपाला हरवलं, आता इतरही राज्यात पराभूत करू, न्यूयॉर्कमधून राहुल गांधींची गर्जना 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 6:34 PM

Rahul Gandhi: कर्नाकट विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता काँग्रेस पक्ष तेलंगाणा आणि इतर राज्यांतील निवडणुकीमध्येही भाजपाला पराभूत करू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला चारीमुंड्या चीत करत मिळवेल्या  दणदणीत विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या देहबोलीतूनही त्याचा प्रत्यय येत आहे. दरम्यान, आज न्यूयॉर्कमधून  राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाकट विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता काँग्रेस पक्ष तेलंगाणा आणि इतर राज्यांतील निवडणुकीमध्येही भाजपाला पराभूत करू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, केवळ काँग्रेस पक्षच नाही, तर भारतातील जनताही भाजपाच्या द्वेशाने भरलेल्या विचारसरणीला पराभूत करणार आहेत. आम्ही भाजपाला पराभूत करू शकतो कर्नाटकमध्ये दाखवून दिलं आहे. आम्ही त्यांना पराभूत केलेलं नाही तर त्यांचा सफाया केले आहे. आम्ही त्यांना कर्नाटकमध्ये चारीमुंड्या चीत केलं आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.

कर्नाटकमध्ये भाजपाने प्रत्येक डाव टाकून पाहिला. त्यांच्यासोबत संपूर्ण प्रसारमाध्यमे होती. आमच्याकडे जेवढा पैसा होता त्याच्या दहा पट पैसा त्यांच्याकडे होता. त्यांच्याकडे सर्व काही होते. तरीही आम्ही त्यांना पराभूत केले. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही आगामी तेलंगाणामध्ये होणाऱ्या निवडणुकीतही भाजपाला पराभूत करणार आहोत. या निवडणुकीनंतर तेलंगाणामध्ये भाजपा शोधूनही सापडणार नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, केवळ काँग्रेस पक्षच नाही तर भारतातील लोक, मध्य प्रदेशमधील लोक, तेलंगाणामधील लोक, राजस्थान-छत्तीसगडमधील लोक भाजपाला पराभूत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपा समाजामध्ये ज्या प्रकारे द्वेष पसरवत आहे, त्यासोबत पुढे जाता येणार नाही हे लोकांना समजले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक